अभिनंदन पत्र लेखन मराठी 2022 | Abhinandan Patra Lekhan in Marathi

पत्रलेखन

अभिनंदन पत्र लेखन मराठी 2022 :- नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आज आपण ” Abhinandan Patra Lekhan in Marathi ” म्हणजेच ” अभिनंदन पत्र लेखन मराठी 2021 ” पाहणार आहोत .

मित्रांनो आपण बर्याचदा आपल्या परीक्षेच्या वेळी मराठी च्या पेपर मध्ये पाहत असतो , कि तेथे एक पत्रलेखनाचा प्रश्न असतो , तेथे एक दिलेला असतो आणि त्या विषयावर आपल्याला अभिनंदन पत्र लिहायचे असते . पण काही वेळेस आपल्याला पत्र लेखनाविषयी पूर्ण माहिती नसल्यामुळे आपण तो प्रश्न तसाच ठेवतो . त्यामुळे आपले काही मार्क जातात . पण इथून पुढे असे होणार नाही .

अभिनंदन पत्र लेखन मराठी या लेखामध्ये आपण विविध विषयांवरील शुभेच्छा अभिनंदन पत्र लेखन मराठी मध्ये पाहणार आहोत . जेणेकरून तुमच्या परीक्षेच्या वेळी जर Abhinandan Patra Lekhan in Marathi हा प्रश्न आला , तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही खाली दिलेल्या नमुन्यांच्या आधारे पत्रलेखन करू शकता किंवा खाली दिलेले नमुने जरी तुमच्या पेपर मध्ये लिहिले तरी चालतील . या लेखामध्ये आपण पुढील मराठी पत्रलेखन नमुना पाहणार आहोत .

  1. तुमच्या लहान भावाचा किंवा बहिणीचा धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक आल्याबद्दल अभिनंदन पत्र लिहा .
  2. चित्रकला स्पर्धेत मित्राचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा .
  3. तुमच्या मित्राचा राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत पहिला क्रमांक आला आहे . त्या मित्राला अभिनंदन करण्यासाठी पत्र लिहा .
  4. दहावी बोर्डाच्या परीक्षा मध्ये प्राविण्य मिळाल्याबाबत अभिनंदन पत्र अभिनंदन पत्र लेखन मराठी
  5. आंतरशालेय निबंध स्पर्धेत तुमच्या मित्राचा / मैत्रिणीचा प्रथम क्रमांक आला आहे . मित्राचे अभिनंदन करणारे पत्र लिहा .
अभिनंदन पत्र लेखन मराठी 2022 | Abhinandan Patra Lekhan in Marathi
अभिनंदन पत्र लेखन मराठी 2022 | Abhinandan Patra Lekhan in Marathi

Content Show

अभिनंदन पत्र लेखन मराठी 2022 | Abhinandan Patra Lekhan in Marathi

तुमच्या लहान भावाचा किंवा बहिणीचा धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक आल्याबद्दल अभिनंदन पत्र लिहा . मराठी पत्रलेखन नमुना .

प्रति ,
श्राव्या जाधव ,
गंगापुरी रोड ,
सातारा , महाराष्ट्र .
दिनांक :- 12 जून 2022

प्रिय बहीण ,

दीदी आज मी खूप आहे . कारण आज मला आईने फोन वरून तुझ्या यशाची बातमी कळवली . फार आनंद झाला . मी जेव्हा तुझा धावण्याच्या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक आला , हि बातमी काळातच माझा आनंद गगनामध्ये मावेनासा झाला . मी हि बातमी लगेचच माझ्यासोबत हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या माझ्या मित्रांना तसेच मैत्रिणींना देखील सांगितली . त्यांना देखील फार आनंद झाला . सर्वांनी तुझे फार कौतुक केले . आणि तुला तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

दिदु मी ज्यावेळी घरी परतेन त्यावेळी आपण तुझ्या यशाबद्दल खूप मोठी पार्टी नक्कीच करू . मला आता असे वाटत आहे कि , मी देखील या क्षणी तुमच्या सोबत असायला हवा होतो . पण ठीक आहे , काही हरकत नाही .

दिदू तू असेच पुढे देखील असेच यश मिळवत राहा आणि तुझ्या सोबतच तुझ्या गुरूंचे , तसेच आपल्या आई-वडिलांचे देखील नाव मोठे कर आणि  हे तू सत्त्यात उतरवशी याची मला नितांत खात्री आहे . तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी तुझ्या दादाकडून खूप-खूप शुभेच्छा .

तुझाच लाडका दादा ,
श्रीतेज जाधव  

चित्रकला स्पर्धेत मित्राचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा . मराठी पत्रलेखन नमुना .

प्रति ,
अंकित पाटील ,
रुपनगर , शनिवार पेठ ,
सातारा , महाराष्ट्र .


प्रिय मित्र ,

मित्रा तुला पत्र लिहिण्याचे कारण एकाच , कि मला तुझा चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला , याची बातमी कळली . या बातमीने मला फार म्हणजे फार आनंद झाला . मी तुला शब्दात सांगू शकत नाही इतका खुश आहे आज .

अंकित तू ज्या स्पर्धेसाठी इतक्या दिवसापासून प्रयत्न करत होतास , अखेर त्या मध्ये तुला यश मिळालाच . मला माहित आहे , कि हे यश तुला नशिबाने नाही , तर तुझ्या मेहतीने आणि तुझ्या जिद्दीने मिळाले आहे . 

अंकित मी ज्यावेळी हि सर्व माहिती घरातील सर्वाना दिली , त्यावेळी घरातील सर्वच जन फार आनंदी झाले . ते तुझे खूप कौतुक करत होते .

मित्रा तू पुढेही अशीच जिद्दीने आणि मेहनतीने का करत राहा . तुझे पुढील आयुष्य नक्कीच सुखकर बनेल . तुला तुझ्या पुढील वाटचालीस तुझ्या लाडक्या मित्राकडून आणि घरातील सर्व व्यक्तींकडून खूप-खूप शुभेच्छा .

तुझा जिवलग मित्र ,
गौरव जाधव 

तुमच्या मित्राचा राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत पहिला क्रमांक आला आहे . त्या मित्राला अभिनंदन करण्यासाठी पत्र लिहा . मराठी पत्रलेखन नमुना .

प्रति ,
श्राव्या पाटील ,
रविवार पेठ  ,
पुणे , महाराष्ट्र .
दिनांक :- ३० जून 2022

प्रिय मित्र ,

मित्रा आजच सकाळी T.V. वर बातम्या पाहत असताना तुझ्या यशाची बातमी कळली . तुझा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक आला . हि बातमी पाहताच मला फार आनंद झाला . म्हणून मी लगेचच पत्र लिहायला सुरुवात केली . मित्रा आज तुझे हे मोठे यश पाहून खूपच आनंद झाला . तुझ्या यशाची बातमी मी लगेचच आईला आणि बाबांना दाखवली . त्यांना देखील फार आनंद झाला .

मित्र तुला आज जास्त काही नाही सांगत , फक्त इथून पुढे देखील तू असेच यश मिळवत राहा आणि तुझ्या आई - वडिलांचे नाव मोठे कर . मला खात्री आहे , कि तू तुझ्या आई- वडिलांचे , तसेच तुझ्या गुरूंचे देखील नाव नक्कीच मोठे करशील .

तू इथून पुढे देखील असेच यश मिळवत राहा . तुला तुझ्या पुढील वाटचालीस खूप-खूप शुभेच्छा .

तुझाच लाडका मित्र ,
राम सावळे 

दहावी बोर्डाच्या परीक्षा मध्ये प्राविण्य मिळाल्याबाबत अभिनंदन पत्र मराठी पत्रलेखन नमुना

प्रति ,
आकाश जाधव ,
रामनगर कोल्हापूर ,
महाराष्ट्र .
दिनांक :- 20 जून 2022

प्रिय मित्र ,

आकाश मला मगाशीच मित्राने फोन केला होता . त्यावेळी मला कळले , कि तू दहावी बोर्डाच्या परीक्षा मध्ये उत्कृष्ट गुणाने पास झालास . हि बातमी कळताच , मी लगेचच देवापुढे साखर ठेवली आणि हि बातमी मी लगेचच आपल्या इतर मित्रांना सांगितली . त्यांना देखील खूप आनंद झाला . मित्रांनी देखील तुझी फार प्रशंसा केली .

मित्रा तू हे एवढे मोठे यश मिळवले हि खूप अभिमानाची गोष्ट आहे . मला खात्री होती कि तू नक्कीच परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवशील आणि तुझे पुढील जे स्वप्न आहेत , ते देखील नक्कीच पूर्ण करशील . 

आकाश तू तुझ्या जीवनामध्ये असेच यश मिळवत राहा आणि मला खात्री देखील नक्कीच आहे , कि तू तुझ्या पुढील आयुष्यामध्ये खूप मोठे यश मिळवशील . आकाश तुला तुझ्या भावी वाटचालीस खूप-खूप शुभेच्छा .

तुझा जिगरी मित्र ,
रुपेश पाटील 

आंतरशालेय निबंध स्पर्धेत तुमच्या मित्राचा / मैत्रिणीचा प्रथम क्रमांक आला आहे . मित्राचे अभिनंदन करणारे पत्र लिहा . मराठी पत्रलेखन नमुना .

प्रति ,
सिद्धेश पाटील ,
रामनगर , गुरुवारपेठ , 
सातारा ४४८७६
दिनांक :- 15 जून 2022

प्रिय मित्र , 

सिद्धेश आज शाळेत गेलो , त्यावेळी शाळेमध्ये तुझे नाव मोठ्या अक्षरामध्ये पहिले . नंतर पुढे जाऊन फळ्यावर जे लिहिलेले वाचले , त्यावेळी मला खूप आनंद झाला . माझा आनंद गगनात मावेनासा झाला . तुझा आंतरशालेय निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला . हि माझ्यासाठी खूप मोठी यशाची बातमी होती . मी घरी गेल्या नंतर ही बातमी आई आणि बाबांना देखील सांगितली . त्यांना देखील फार आनंद झाला . दोघांनीही तुझे फार कौतुक केले .

मित्रा तुझे वाचन , तसेच तुझे अक्षरही अगदी सुंदर आहे . याचमुळे तू नेहमी निबंध स्पर्धेत क्रमांक पटकावत असतो . 

तू असेच पुढेही विविध स्पर्धेमध्ये यश मिळवत राहा . तुला तुझ्या पुढील वाटचालीस कोटी-कोटी शुभेच्छा .

तुझा जिवलग मित्र ,
कार्तिक जाधव 

Abhinandan Patra Lekhan in Marathi Video

मित्रांनो जर आपला अभिनंदन पत्र लेखन मराठी 2022 ( Abhinandan Patra Lekhan in Marathi ) हा लेख वाचूनही जर तुम्हांला अभिनंदन पत्र लेखन याविषयी आणखी माहिती हवी असेल , तर तुम्ही खाली दिलेला Video पाहू शकता . जेणेकरून जर Abhinandan Patra in Marathi याविषयी काही शंका असतील , तर या नक्कीच दूर होतील . याच बरोबर जर हा Video आवडला , तर एक कॉमेंट करून नक्कीच कळवा .

सैन्यात भरती झाल्याबद्दल भावाला अभिनंदन पत्र | Marathi letter writing | पत्रलेखन मराठी भाषेत

आपण काय शिकलो ?

अभिनंदन पत्र लेखन मराठी 2022 :- मित्रांनो आजच्या लेखामध्ये आज आपण ” Abhinandan Patra Lekhan in Marathi ” म्हणजेच ” अभिनंदन पत्र लेखन मराठी 2022 ” पहिले . यातच आपण विविध प्रकारचे मराठी पत्रलेखन नमुना देखील पहिले .

हे अभिनंदन पत्र इयत्ता नववी साठी देखील वापरू शकता .याचबरोबर तुम्ही हे अभिनंदन पत्र इयत्ता दहावी साठी देखील वापरू शकता .

अभिनंदन पत्र लेखन मराठी 2022 | Abhinandan Patra Lekhan in Marathi
अभिनंदन पत्र लेखन मराठी 2022 | Abhinandan Patra Lekhan in Marathi

मित्रांनो अभिनंदन पत्र लेखन मराठी 2022 ( Abhinandan Patra Lekhan in Marathi ) हा लेख आवडला असेल , तर एक कॉमेंट करून नक्कीच कळवा . याचबरोबर तुमच्या इतर मित्र तसेह मैत्रिणीसोबत देखील नक्कीच शेअर करा . जेणेकरून त्यांना परीक्षेच्या वेळी जरी अभिनंदन पत्र लेखन चा जर प्रश्न आला , तर ते देखील अभिनंदन पत्र लेखन मराठी मध्ये व्यवस्तीत लिहू शकतील .

मित्रांनो अभिनंदन पत्र लेखन मराठी या लेखाचा थोडा जरी फायदा झाला असेल , तर एक कॉमेंट करून नक्कीच कळवा .

धन्यवाद …!

आणखी वाचा :-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *