बातमी लेखन मराठी | Batmi Lekhan in Marathiबातमी लेखन मराठी | Batmi Lekhan in Marathi

काय मित्रांनो तुम्ही देखील ” बातमी लेखन मराठी | Batmi Lekhan in Marathi ” शोधत आहात का ? हो , तर मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात .

Batmi Lekhan in Marathi या लेखामध्ये आज आपण Batmi Lekhan in Marathi 10th class 2022 पाहणार आहोत . या बातमी लेखन मराठीचा वापर ८ वी , ९ वी , १० वी किंवा इतर वर्गातील विद्यार्थी देखील करू शकतात .

मित्रांनो बातमी लेखन मराठी 8वी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचा . मला खात्री आहे , कि हा लेख तुम्हांला नक्कीच आवडेल .

बातमी लेखन मराठी | Batmi Lekhan in Marathi
बातमी लेखन मराठी | Batmi Lekhan in Marathi

बातमी लेखन मराठी | Batmi Lekhan in Marathi

मित्रांनो आजची युग हे माहितीचे युग आहे . तंत्रज्ञान प्रसारमाध्यमे यांच्यामुळे जग खरोखरच जवळ आलेले आहे . जगात कुठेही घडलेल्या घटना त्यांचे अचूक माहिती आपल्याला घरात बसून आकाशवाणी , वर्तमानपत्र , दूरदर्शन यान प्रकारच्या प्रसारमाध्यमांद्वारे सविस्तर कळते . रोजच्या जीवनातील अगदी “ जलवाहिनी नादुरुस्त झाल्यामुळे उद्या शहराचा पाणीपुरवठा बंद राहील “.

यांसारख्या आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित बातमींपासून “ भारताकडून क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी “ अशा राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या बातम्यांपर्यंत सर्व बातम्या आपल्याला कळतात माहिती देणे , ज्ञान देणे , समाज प्रबोधन करणे , परिस्थितीची जाणीव करून देणे हे बातमीचे प्रमुख उद्देश असतात .

बातमी म्हणजे काय ?

मित्रांनो बातमी हा आजच्या जीवनातला अविभाज्य घटकच आहे आणि म्हणूनच वस्तुस्थितीचे चित्रण करणारे बातमी तयार करणे , ( बातमी लेखन करणे ) हे आजचे महत्त्वाचे कौशल्य ठरते . बातमी घडून गेलेल्या घटनांची त्याचप्रमाणे घडणाऱ्या नियोजित कार्याचीही होते .

  • ज्यात काय घडले ?
  • कधी घडले कोठे घडले ?
  • कसे घडले ?
  • कोण कोण उपस्थित होते ?

या प्रश्नांची उत्तरे मिळतात , म्हणजे बातमी लेखनात जसे घडले तसे वर्णन करायला हवे .

बातमी लेखनासाठी आवश्यक

  • लेखन कौशल्य
  • भाषेचे उत्तम ज्ञान व्याकरणाची जाण
  • सोपी सुटसुटीत वाक्यरचना
  • समग्र वाचन

बातमी तयार करताना घ्यावयाची काळजी

घटनेची विश्वासार्हता तटस्थ भूमिकेतून लेखन घटनेचा अचूक व योग्य तपशील प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचे लेखन होणे महत्त्वाचे स्वतःच्या मनाची कोणतीही बाब त्यात समाविष्ट करू नये .

बातमी तयार करण्याचे स्वरूप

शीर्षक

  • बातमीचा मथळा हा संपूर्ण बातमीचा घटनेचा आरसा असतो .
  • बातमीचे शीर्षक दोन शब्दांपासून ते काही शब्दांपर्यंत असू शकते .
  • बातमीचे शीर्षक नेहमी कमीत कमी शब्दात लिहावे .
  • बातमी ते शीर्षक वाचता क्षणी वाचकांना आशयाची ओळख करून देणारे असावे .
  • बातमीचे शीर्षक हे कुतूहल निर्माण करणारे असावे .
  • बातमीचे शीर्षक हे बातमीची उत्कंठा करणारे असावे .
  • वरील दिलेल्या या सहा मुद्द्यांचा वापर करून बातमीचे शीर्षक देणे गरजेचे आहे .

दिनांक स्थळ आणि कालावधी

बातमीत सांगितलेली घटना कोठे घडली ? हे यात सांगितले जाते . याच्यानंतर बातमीला सुरुवात केली जाते .

बातमीचा स्रोत

बातमी कोणी दिली आहे ? हे या भागात सांगितले जाते .

बातमीचा वरचा भाग

बातमीचा सर्वात वरचा भाग म्हणजे शिरोभाग . या भागामध्ये बातमी शी संबंधित अतिशय महत्त्वाचा भाग दिला जातो . बातमीचा शिरोभाग वाचल्यानंतर बातमी बद्दल असलेली उत्कंठा निर्माण होत असते .

विस्तृत बातमी

शिरोभागाच्या नंतर बातमीचा विस्तृत तपशील दिला जातो . बातमीचा संपूर्ण संदर्भ यामध्ये दिलेला असतो . मागील संदर्भ काय आहे व पुढील संदर्भ , तसेच सविस्तर बातमी यामध्ये दिलेली असते . या भागानंतर बातमी संपते .

बातमीचे विविध क्षेत्र

  • राजकीय
  • शालेय / शैक्षणिक
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • वैद्यकीय
  • वैज्ञानिक
  • दैनंदिन

घटना या घटकांच्या संदर्भात घडलेल्या घटनांच्या बातम्या तयार होतात .

बातमी तयार करणे – मूल्यमापन कृती

  • दिलेल्या घटनेवर बातमी तयार करणे.
  • दिलेल्या सुचक शब्दांवरून बातमी तयार करणे.
  • कार्यक्रमाची बातमी तयार करणे.

आपण काय शिकलो ?

मित्रांनो मी आशा करतो , कि ” बातमी लेखन मराठी | Batmi Lekhan in Marathi ” या विषयी जी माहिती तुम्हांला हवी होती , ती तुम्हांला नक्कीच मिळाली असले .

बातमी लेखन मराठी हा लेख आवडला असेल , तर तुमच्या मित्र तसेच मैत्रिणींना देखील नक्कीच शेअर करा .

धन्यवाद …!

हे देखील वाचा :-

TEAM IN MARATHI LEKHAK