Bud Bud Ghagri Story In Marathi | बुडबुड घागरी मराठी बोधकथा

बुडबुड घागरी मराठी बोधकथा | Bud Bud Ghagri Story In Marathi

Uncategorized गोष्टी

मित्रांनो तुम्हांला देखील गोष्टी वाचायला आवडतात का ? आणि तुम्ही देखील ” बुडबुड घागरी मराठी बोधकथा ( Bud Bud Ghagri Story In Marathi ) ” शोधत असाल , तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात .

मित्रांनो या लेखामध्ये आज आपण बुडबुड घागरी मराठी गोष्ट पाहणार आहोत . हि गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचा . मित्रांनो मला खात्री आहे , कि हि Bud Bud Ghagri Marathi Gosht तुम्हांला नक्कीच आवडेल .

बुडबुड घागरी मराठी बोधकथा | Bud Bud Ghagri Story In Marathi
Bud Bud Ghagri Story In Marathi | बुडबुड घागरी मराठी बोधकथा

बुडबुड घागरी मराठी बोधकथा | Bud Bud Ghagri Story In Marathi

एका गावात एक मांजर माकड आणि उंदीर राहत होते. हे तिघेही एक चांगले मित्र होते. एकदा त्यांनी ठरवले, की आपण तयार करायची. बेत ठरला. पण साहित्य कोण आणणार असा त्यांना प्रश्न पडला होता ? मांजर म्हणाले, “  मी दूध घेऊन येते  . “ माकड म्हणाले , “ मी पाहतेला घेऊन येतो. “ माकड म्हणाला , “ मी साखर आणि रवा घेऊन येतो. “ ठरल्याप्रमाणे सर्व आपापले साहित्य घेऊन आले .

खीर बनवण्याचा बेत सुरु झाला. छान पैकी चूल पेटवली आणि त्याच्या वर पातेले ठेवून त्याच्यामध्ये दूध साखर आणि रवा हे टाकून छान पैकी तयार करायला सुरुवात झाली. मांजरीने खीर बनवली आणि माकड आणि उंदीर यांनी तिला मदत केली. छान पैकी वास दरवळत होता. खीर तयार झाली पण गरम असल्यामुळे आपण ती खाऊ शकणार नाही. म्हणून तिघांनीही ठरवले, की आपण थोडसं खेळून येऊया आणि म्हणून खेळायला बाहेर पडले. मांजरीला खिरीचा वास छान पैकी येत होता. तिच्या तोंडाला पाणी सुटले होते. आपण केव्हा एकदा खीर खातो आहे,  असे तिला झाले होते आणि म्हणून उंदीर आणि माकड या दोघांचाही डोळा चुकून मांजर गुपचूप मागे फिरून आली.

आल्यानंतर तिने पातेल्याच झाकण उघडलं आणि थोडीशी खीर खाल्ली. इतकी सुंदर झाली होती, की ती थोडी-थोडी करता – करता मांजरीने संपूर्ण खीर खाऊन टाकली. पूर्ण काम झालं आणि मग तिने त्या पातेल्यावर झाकण होतं. ते पातेल्यावर ठेवलं आणि बाजूलाच झाडाखाली झोपी गेले.

माकड आणि उंदीर आणि थोड्या वेळाने आले आणि पाहतो तर काय त्याबरोबर माकडाला आणि उंदीर आला मोठा धक्काच बसला. यामध्ये तर खरच नाही कोणी खाल्ली असेल, ते दोघेही मांजराकडे संशयाने पाहू लागले. मांजर उठली आणि म्हणाली, “ कोणी खाल्ली असेल “ माकड आणि उंदीर मांजरीकडे संशयाने पाहतच राहिले . तेवढ्यात हे पाहून मांजरीने सांगितले , “ मी आत्ताच आले , झोपली होती . कोणी खाल्ली हे काही मला माहित नाही . मी खीर खाल्ली नाही . 

खीर कोणी खाल्ली हे शोधण्यासाठी माकड एक घागर घेऊन आला आणि पाण्यामध्ये उलटी ठेवली. आपण तिघांनी एक एक करून त्या पालथ्या घागरीवर उभारायचं आणि म्हणायचं, “ मी खीर खाल्ली असेल , तर बुड बुड घागरी “ मी खीर खाल्ली असेल , त्यावेळीही घागर पाण्यात बुडेल . “ ठरल्याप्रमाणे तिघांनीही एकेक करून त्या घागरी वर चढण्याचा आणि बोलण्याचा निश्चय केला . 

सर्वात अगोदर माकड त्या घागरीवर उभे राहिले आणि म्हणाले, “ मी खीर खाल्ली असेल , तर बुड बुड घागरी “ घागर काही बुडाली नाही. त्यानंतर उंदराची पाळी आली उंदीर सुद्धा घागरीवर चढला आणि म्हणाला , “ मी खीर खाल्ली असेल तर बुड बुड घागरी “ , यावेळी देखील काही घागर बुडाली नाही . 

आता मांजरीची पाळी आली , मांजर घागरीवर चढायला लागली पण जर घागरीवर चढली नाही तर हे दोघे म्हणतील , की ही खोटी आहे . म्हणून मांजर देखील त्या घागरीवर चढली . घागरीवर चढल्यानंतर तिचे हात पाय अवतरू लागले . “ आपण तर खीर खाल्ली आहे आणि आपण तर खोटं बोललो आहे. “ यामुळे आता घागर बुडाली  तर आपण सुद्धा पाण्यामध्ये वाहून जाणार असा ,  विचार मांजरीच्या मनात येत होता . यामुळे तिचे हात-पाय आणखीच अवतरू लागले आणि ती म्हणायला लागली, “ मी खीर खाल्ली असेल , तर बुड बुड घागरी आणि इतक्या जोराने तिचे पाय कापायला लागले , याचा परिणाम झाला आणि घागर उलटी झाली आणि त्या घागरीमध्ये पाणी शिरले आणि घागर पाण्यामध्ये बुडाली आणि त्याचबरोबर मांजर सुद्धा गटांगळ्या खात त्या पाण्यामध्ये बुडायला लागली . 

“ मला माफ करा. मला वाचवा. मी खीर खाल्ली आहे. मी खोटे बोलले , “ असे मांजर बोलली . हे पाहून माकड आणि उंदीर हैराण झाले .

तात्पर्य :- नेहमी खरे बोलावे .

आपण काय शिकलो ?

मित्रांनो या लेखामध्ये आज आपण” बुडबुड घागरी मराठी बोधकथा ( Bud Bud Ghagri Story In Marathi ) ” पहिली .

मित्रांनो हि गोष्ट आवडली असेल , तर तुमच्या इतर मित्र तसेच मैत्रिणींसोबत देखील नक्कीच शेअर करा आणि खालील बाजूला असलेया स्टार्स पैकी तुम्ही या लेखाला स्टार्स देऊ शकता .

हे देखील वाचा :-

धन्यवाद …!

TEAM IN MARATHI LEKHAK