मित्रांनो तुम्हांला देखील गोष्टी वाचायला आवडतात का ? आणि तुम्ही देखील ” चल रे भोपळया टुणुक टुणुक मराठी बालकथा ( Chal Re Bhoplya Tunuk Tunuk Story In Marathi ) ” शोधत असाल , तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात .
मित्रांनो या लेखामध्ये आज आपण चल रे भोपळ्या टुणुक टुणुक मराठी गोष्ट पाहणार आहोत . हि गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचा . मित्रांनो मला खात्री आहे , कि हि Chal Re Bhoplya Tunuk Tunuk Gosht Marathi तुम्हांला नक्कीच आवडेल .

चल रे भोपळया टुणुक टुणुक – मराठी बालकथा Chal Re Bhoplya Tunuk Tunuk Story In Marathi
एकेकाळी एका लहानशा गावात एक म्हातारी राहत होती. या म्हातारीचं हो रमा होते. गावाचे चारही बाजूला दाट जंगल होते. रमा नावाची ही बाई म्हातारी असले, तरी ती खूप चतूर होती. या म्हातारीला एक मुलगी देखील होती. मुलीचे लग्न होऊन, ती जंगलाच्या पलीकडे दुसऱ्या गावात राहत होती. एके दिवशी रमाच्या मनात विचार आला, की बरेच दिवस झाले, मुलीची भेट झाली नाही. मग आपणच तिला भेटायला का जाऊ नये.
रमाने मुलीच्या आवडीचे अनेक पदार्थ तयार केले आणि आपला प्रवास सुरू केला. रमा जंगलातून चालत होती. जंगल घनदाट झाडांनी आणि अनेक प्राण्यांनी भरलेलं होतं. काही वेळ पायी चालून रमा दमली होती. यामुळे आराम करायला बसली. याच बरोबर तिला भूकही लागलेली होती. तिने खाऊचा डबा उघडला आणि तेवढ्यात समोरच्या झाडीतुन विचित्र आवाज ऐकला समोर पाहते, तर काय एक भलामोठा लांडगा उभा होता. खरंतर रमा खूपच घाबरली होती, पण तिने आपली भीती दाखवली नाही. तिने लांडग्याला विचारले काय , “ अरे बाबा तुला काय हव आहे ? “ लांडगा म्हणाला , “ मी उपाशी आहे. आता मी तुला खाणार . “ रमा चतुर होती. ती म्हणाली , “ लवकर खाऊन टाक रे , बाबा मला कारण मी म्हातारी अशक्त बाई तुझ्यासमोर माझा काय निभाव लागणार , पण असा आहे , की जर तुम्हाला आत्ताच खाल्लं , तर तुला फक्त अशक्त हाडेच मिळतील . पण तू मला जाऊ दिलेस , तर मी लेकीकडे जाईन , चांगलंचुंगलं खाईन , जाडजूड होईल , मग तू मला खा . लांडग्याने विचार केला , की आजीबाई अगदी बरोबर बोलत आहेत , पण तो म्हणाला , “ अगं पण तू नक्की परत येशील ना ? “ हो रे बाबा माझ्यावर विश्वास ठेवू . “ असे रमा म्हणाली . त्यानंतर लांडग्याने तिला जाऊ दिले .
रमानी आपला पुढचा प्रवास सुरु केला . पुढे पुढे जाताच तिच्यासमोर एक वाघ आला . तो म्हणाला अरे वा ! आज एकदम झकास जेवण मिळणार आहे . “ आजीबाई चल देवाचं नाव घे , म्हणजे मी तुला खायला मोकळा . “ तिने मनाशी ठरवले , ” या लांडग्या सारखेच या वाघाला देखील वेड बनवायचं “ राम म्हणाली , “ मी अशक्त म्हातारी तुझ्यासमोर माझा काय निभाव लागणार , चल एकदाच फस्त करुनच टाक मला आधी मी जे काही सांगते , ते ऐकलं तर बर होईल . वाघ म्हणाला , “ जे काही बोलायचे ते लवकर बोलून टाक , तू आत्ताच जर मला खाल्लं तर तुला फक्त हाडेच चगळावी लागतील आणि जर तू मला सोडून दिलेस , तर मी माझ्या लेकीकडे जाईन तूप रोटी खाईन जाडजूड होईन . मग तू मला खा . वाघ म्हणाला , “ एवढे चांगले जेवण सोडून द्यायला मी काय तुला मूर्ख वाटतोय ? म्हातारी म्हणाली ठीक आहे बाबा तुला मात्र हाडेच खायचे असतील , तर मग खाऊन टाक एकदाच . आता मात्र वाघाने थोडा विचार केला , “ म्हातारी बरोबर बोलत आहे . तो म्हणाला परत यायचं वचन . “ दे म्हातारी म्हणाली मी नक्की परत येईल . “ वाघाने तिला जाऊन दिले .
म्हातारीने तिचा पुढचा प्रवास सुरु केला. थोड्याच अंतरावर म्हाताऱ्या समोर उभा राहिला. सिंहने विचार केला चला जेवणाची सोय झाली आणि तोही एक मानव म्हणजे नक्कीच एक चवदार भोजन . “ आजीबाई पाळायचा प्रयत्न करू नको , अगदी सरळ उभी राहा , “ असा सिंह म्हातारीला म्हणाला . रमाने विचार केला , “ आता या सिंहालाही फसवावे लागणार . हे जंगलाचा राजा मला लवकर खाऊन टाक . मी अशक्त म्हातारी , हो पण माझी एक विनंती आहे , जरा ऐकून घेशील का रे ? सिंह म्हणाला गप्प उभी राहा . माझ्याकडे वेळ नाही . म्हातारी म्हणाली , “ अरे जरा बघ माझ्याकडे धड उभेही राहू शकत नाही . आम्हाला खाऊन तुला काय मिळणार ? फक्त हाडे . मी माझ्या मुलीच्या घरी जात आहे . तेथे जाऊन छान छान खाईन जाडजूड होईल , मग तू मला खा . सिंह म्हणाला , “ ते आजीबाई तू कोणाला फसवतेस जंगलाच्या राजाला , “ म्हातारी म्हणाली , “ जशी तुझी मर्जी चल लवकर खाऊन टाका एकदाच आता मात्र सिंह आणि विचार केला . आजीबाई बरोबर बोलत आहे . म्हणाला तू नक्की परत येशील ना ? मला वचन दे , म्हातारी म्हणाली , “ हो रे बाबा एवढ्या विश्वासाने तू मला जीवनदान देत आहेस , म्हणूनच मी परत येईन रमाने देवाचे आभार मानले आणि ती तिच्या पुढच्या प्रवासाला लागली .
जंगल मागे टाकून ती मुलीच्या घरी सुखरूप पोहोचली. आईला बघून तिच्या मुलीला फार आनंद झाला. दोघींनी एकत्र भोजन केले. रमाने जंगलामध्ये घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. मुलगी म्हणाली देवाच्या कृपेने तू सुखरूप आलीस. आता आरामात राहा रमा मुलीच्या घरी आनंदाने राहत होती. चांगले खात होती , पीत होती , सुखात राहत होती . काही दिवसांनी तिला आपल्या गावाची आणि घराची आठवण येऊ लागली. तिने मुलीला सांगितले , “ तू माझा छान पाहुणचार केला पण आता मला माझ्या घरी परत जायचे आहे. “ पण तेवढ्यात लांडगा वाघ आणि सिंह आठवले. ती मनातून खूप घाबरली. तिची मुलगी देखील तिच्या सारखीच चतुर होती. ती म्हणाली , “ आई तु अजीबात घाबरु नकोस , मला एक छान युक्ती सुचली आहे. तिने आपल्या बागेतल्या एक मोठा भोपळा आणून दिला. तो भोपळा आतून पूर्ण रिकामा केला. ती आपल्या आईला म्हणाली , “ तू या भोपळा मध्ये बसून तुझा प्रवास कर , वाटेत जरी जनावरे आडवी आली, तरी त्यांना म्हणावं , “ म्हातारीकोतारी मला नाही ठाऊक ? चल रे भोपळ्या टुणुक टुणुक . “
रमाने भोपळ्यात बसून आपल्या परतीचा प्रवास सुरू केला, वाटेत तिला सिंह भेटला. सिंहाने भोपळ्याला अडवले आणि विचारले , “ काय रे भोपळ्या तू एखाद्या म्हातारीला पाहिलेस का ? तिने काही दिवसांमध्ये परत येतो , वचन दिलेलं होतं . भोपळ्या ने उत्तर दिले , “ म्हातारीकोतारी मला नाही ठाऊक ? चल रे भोपळ्या टुणुक टुणुक . “ सिंह चकित झाला आणि त्याने भोपळ्याला जाऊन दिले .
भोपळा पुढे गेल्यानंतर थोड्याच अंतरावर त्याला वाघाने अडवले. येणारा भोपळा पाहून वाघ चकित झाला. “ काय रे भोपळ्या एखाद्या म्हातारीला पाहिलेस का ? “ भोपळे यांनी उत्तर दिले, “ म्हातारीकोतारी मला नाही ठाऊक ? चल रे भोपळ्या टुणुक, टुणुक . “ भोपळा वर विश्वास ठेवला आणि त्याला जाऊ दिले .
थोडे दूर गेल्यावर वाटेत तिला लांडगा दिसला. चालणारा भोपळा पाहून तोही चकित झाला. त्याने विचारले, “ अरे भोपळ्या एखाद्या आजीबाईला पाहिलेस का ? याच वाटेने ती परत येणार होती. “ भोपळ्या ने उत्तर दिले, “ म्हातारीकोतारी मला नाही ठाऊक ? चल रे भोपळ्या टुणुक, टुणुक “ लांडग्याने ही भोपळ्याला जाऊ दिले .
भोपळ्यात बसलेली रमा आता आरामात आपल्या गावाकडे जाऊ लागली. तिने लांडगा, वाघ आणि सिंह सर्वांना चांगलेच बसफसवले होते आणि हो रमाच्या चतुर मुलीमुळेच तिचे प्राण वाचले. रमा सुखरूप घरी पोचली आणि आनंदाने राहू लागली.
आपण काय शिकलो ?
मित्रांनो या लेखामध्ये आज आपण ” चल रे भोपळया टुणुक टुणुक मराठी बालकथा ( Chal Re Bhoplya Tunuk Tunuk Story In Marathi ) ” पहिली .
मित्रांनो हि गोष्ट आवडली असेल , तर तुमच्या इतर मित्र तसेच मैत्रिणींसोबत देखील नक्कीच शेअर करा आणि खालील बाजूला असलेल्या स्टार्स पैकी तुम्ही या लेखाला स्टार्स देऊ शकता .
हे देखील वाचा :-
- आणखी मराठी गोष्टी वाचण्यासाठी येथे क्लिक करा .
- चल रे भोपळया टुणुक टुणुक मराठी बालकथा
- उंदराची टोपी मराठी बोधकथा
- ससा आणि कासवाची शर्यत गोष्ट
- मुंगी आणि कबुतराची गोष्ट
धन्यवाद …!
TEAM IN MARATHI LEKHAK