Crop Insurance 2023 :- नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सलग चौथ्या वर्षी देखील अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या हाताबाहेरच गेलेला आहे अतुवृष्टी पूर तसेच गोगलगायीमुळे मराठवाड्यामध्ये आत्तापर्यंत दहा लाख 81 हजार 761 हेक्टर वरील पिके नष्ट झालेली आहेत यामुळेच सरकारकडे नुकसान भरपाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
दरम्यान राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांसाठी सरकार तीन हजार कोटी रुपयांची घोषणा देखील केलेल्या आता मराठवाडा विभागासाठी 1106 कोटी रुपये निधी मिळाला हा निधी गुरुवार व शुक्रवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे जमा केले जाणार आहेत.
कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी निधी मिळणार आहे?
महाराष्ट्र मध्ये मराठवाड्यातील जालना परभणी, हिंगोली, नांदेड लातूर उस्मानाबाद जिल्ह्याचे नुकसान भरपाई रक्कम प्राप्त झालेली आहे मात्र याचवेळी औरंगाबाद जिल्ह्या या यादीमधून वगळण्यात आले होते यामुळेच शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप प व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे विशेष औरंगाबाद जिल्ह्यात अनेक भागांमध्ये नुकसान झालेले आहे पिकांची नुकसान झालेले आहे याचबरोबर शेती देखील वाहून गेलेला आपल्याला पाहायला मिळते हे सर्व काही असताना देखील औरंगाबाद जिल्ह्याला या नुकसान भरपाई मधून वगळण्यात आलेले आहे यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करत आहेत.

मित्रांनो हा लेख आवडला असेल , तर इतरांना देखील नक्कीच शेअर करा.
धन्यवाद ..!