Kabutar-Ani-Mungi-Chi-Goshta-मुंगी-आणि-कबुतराची-गोष्ट

मुंगी आणि कबुतराची गोष्ट | Kabutar Ani Mungi Chi Goshta

Uncategorized गोष्टी

मित्रांनो तुम्हांला देखील गोष्टी वाचायला आवडतात का ? आणि तुम्ही देखील ” मुंगी आणि कबुतराची गोष्ट ( Kabutar Ani Mungi Chi Goshta ) ” शोधत असाल , तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात .

मित्रांनो या लेखामध्ये आज आपण Kabutar Ani Shikari Chi Goshta पाहणार आहोत . हि गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचा . मित्रांनो मला खात्री आहे , कि हि Mungi Ani Kabutar Chi Katha तुम्हांला नक्कीच आवडेल .

Kabutar-Ani-Mungi-Chi-Goshta-मुंगी-आणि-कबुतराची-गोष्ट
Kabutar-Ani-Mungi-Chi-Goshta-मुंगी-आणि-कबुतराची-गोष्ट

मुंगी आणि कबुतराची गोष्ट | Kabutar Ani Mungi Chi Goshta

एकदा एका झाडावर मुंगी राहत होती . एक दिवस अन्नाच्या शोधात ती इकडे – तिकडे फिरत होती . अचानक तिचा पाय घसरून ती पाण्यात पडली आणि ती वाहू लागली . ” वाचवा – वाचवा अरे मला कोणीतरी वाचवा ” , असे म्हणत होती . मदत मागत होती . एका कबूतरने मुंगी ला वाहताना आणि ओरडताना पाहिले . त्याने मुंगीची मदत करण्याचा निर्णय घेतला . मुंगीची मदत करण्यासाठी त्याने एक पान तोडून पाण्यात टाकले . पानावर चढून मुंगी किनाऱ्यावर आली . मुंगी ने पाहिले की कबूतर आणि आपली मदत केली आहे .  म्हणून कबुतराचे आभार मानण्यासाठी ती झाडावर चढली . झाडावर चढून ती कबुतरा जवळ पोहोचली . ” धन्यवाद तू माझे प्राण वाचवले आहेस ” , असे म्हणत मुंगीने कबुतरा चे आभार मानले . ” असे काय म्हणतोयस ? हे तर माझं कर्तव्य होते . ” असे कबूतर म्हणाले , ” मी आभारी आहे तुला कधीही मदत लागली , तरी जरूर मला हाक मार ” , असे म्हणून मुंगी ती तिच्या मार्गावर गेली . 

दोघांचेही आयुष्य मोठ्या सुखामध्ये चालले होते . एक दिवस मुंगी आपले जेवण घेऊन घरी चालली होती . अचानक तिच्या समोर दोन पाय आले , मुंगीने चटकन वर पाहिले तिथे एक शिकारी उभा होता आणि त्याच्या हातामध्ये धनुष्यबाण होता . मुंगीला समजले की तो कोणावर तरी लक्ष साधत आहे . तिने बाणाच्या दिशेने पाहिले , तर त्या ठिकाणी तिचा मित्र कबूतर उभा होता . मुंगीने विचार केला आणि कबूतर जीव वाचवण्याचा निर्णय घेतला . त्याच क्षणी मुंगीने शिकार्‍याच्या पायाला कडकडून चावा घेतला . वेदनेने कळवळून शिकारी जोरात ओरडला . शिकार्‍याची एकाग्रता भंग झाली  आणि त्याचा बाण भलत्याच दिशेने गेला . या आवाजाने सावध होऊन कबूतर तिथून उडून गेले . 

काही वेळानंतर कबूतर मुंगी ला भेटले . ” धन्यवाद मित्रा ” , असे म्हणत कबूतराने आणि मुंगी चे आभार मानले . त्या दिवसापासून कबुतर आणि मुंगी हे दोन्ही फार घनिष्ठ मित्र बनले . दोघेही खुशीने राहू लागले .

आपण काय शिकलो ?

मित्रांनो या लेखामध्ये आज आपण” मुंगी आणि कबुतराची गोष्ट ( Kabutar Ani Mungi Chi Goshta ) ” पहिली .

मित्रांनो हि गोष्ट आवडली असेल , तर तुमच्या इतर मित्र तसेच मैत्रिणींसोबत देखील नक्कीच शेअर करा आणि खालील बाजूला असलेल्या स्टार्स पैकी तुम्ही या लेखाला स्टार्स देऊ शकता .

हे देखील वाचा :-

धन्यवाद …!

TEAM IN MARATHI LEKHAK