मित्रांनो तुम्हांला देखील गोष्टी वाचायला आवडतात का ? आणि तुम्ही देखील ” कोल्हा आणि करकोचा गोष्ट मराठीमध्ये ( Kolha Ani Karkocha Story in Marathi ) ” शोधत असाल , तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात .
मित्रांनो या लेखामध्ये आज आपण कोल्हा आणि करकोचा मराठी गोष्ट पाहणार आहोत . हि गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचा . मित्रांनो मला खात्री आहे , कि हि Kolha aani karkocha Marathi Katha तुम्हांला नक्कीच आवडेल .

Kolha Ani Karkocha Story in Marathi | कोल्हा आणि करकोचा गोष्ट मराठीमध्ये
एक होता कोल्हा आणि एक होता करकोचा . कोल्हा आणि करकोचा ची दोस्ती होती . पण ती कशी एकमेकांना खोड्या काढण्यासाठीची यांची दोस्ती होती .
एक दिवशी काय झाले , की कोल्ह्याने करकोचाला सांगितले , “ करकोचे दादा , करकोचे दादा आज माझ्याकडे जेवायला या . “ करकोचा म्हणाला , “ हो मी येतो . “ कोल्हा आणि करकोचा कोल्हाच्या घरी जेवायला गेले . कोल्ह्याने खीर केलेली , ती ताटात वाढली आणि करकोचे दादाला म्हणाला , “ करकोचे दादा जेवायला सुरुवात करा . मीही जेवायला सुरुवात करतो . “ कोल्ह्याने खीर खायला सुरुवात केली . करकोच्याची चोच लांब असल्यामुळे करकोचा ला खीर खाताच आली नाही . यामुळे तो उपाशीच राहिला . कोल्होबा करकोच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले , “ करकोचे दादा , करकोचे दादा कसे आहे जेवण ? छान झाले ना ? भरले ना पोट ? “ करकोचा खर तर उपाशी होता , पण तो हुशार होता . करकोचा म्हणाला , “ हो माझं पोट भरले ना . आता तुम्ही असे करा , उद्या तुम्ही माझ्या घरी जेवायला या . “ यावर कोल्हा म्हणाला , “ बरं मग ठीक आहे . आज तुम्ही माझ्याकडे जेवायला आला , उद्या मी तुमच्याकडे जेवायला येतो . “
दुसर्यादिवशी कोल्हा आणि करकोचा करकोचाच्या घरी जेवायला गेले . करकोचा आणि कोल्हा हे दोघेही करकोचाच्या घरी पोहोचले . करकोचाने एका माठात खीर बनवलेली होती . दोघांनीही ती माठामधील खीर घेतली आणि करकोचा म्हणाला , “ कोल्हे दादा करा जेवायला सुरुवात . मी पण करतो . “ करकोचा लांब चोची मधून तो माठ मधील खीर खाते होता .
याचबरोबर कोल्ह्याने देखील खीर खायला सुरुवात केली . पण त्याचे माठामध्ये तोंड घातल्यावर ही त्याची जीभ खीरी पर्यंत पोहोचत नव्हती . मग त्याने आणखीन तोंड माठामध्ये घातले , पण तो माठ फुटून गेला . माठा मधील जी सर्व खीर होती , ती खाली सांडली . काराकोच्याचे पोट भरलेलं होतं . पण कोल्ह्याला खीर खायला मिळालीच नव्हती . करकोच्याने कोल्हाला विचारले , “ कोल्हे दादा , कोल्हे दादा कस काय झालं जेवण ? पोट भरलं ना ? यावर कोल्हा म्हणाला , “ अहो तुम्ही मला शिक्षा करण्यासाठी तिकडे जेवायला बोलावलं , हे मला कळले . तुम्ही खरेच हुशार आहात . आता मी तुमची खोडी कधीच पुन्हा करणार नाही .
आपण काय शिकलो ?
मित्रांनो या लेखामध्ये आज आपण ” कोल्हा आणि करकोचा गोष्ट मराठीमध्ये ( Kolha Ani Karkocha Story in Marathi ) ” पहिली .
मित्रांनो हि गोष्ट आवडली असेल , तर तुमच्या इतर मित्र तसेच मैत्रिणींसोबत देखील नक्कीच शेअर करा आणि खालील बाजूला असलेल्या स्टार्स पैकी तुम्ही या लेखाला स्टार्स देऊ शकता .
हे देखील वाचा :-
- आणखी मराठी गोष्टी वाचण्यासाठी येथे क्लिक करा .
- चल रे भोपळया टुणुक टुणुक मराठी बालकथा
- उंदराची टोपी मराठी बोधकथा
- ससा आणि कासवाची शर्यत गोष्ट
- मुंगी आणि कबुतराची गोष्ट
धन्यवाद …!
TEAM IN MARATHI LEKHAK