काय मित्रांनो तुम्ही देखील ” शालेय क्रीडा साहित्य मागणी पत्र | Krida Sahitya Magni Patra In Marathi “ या विषयी माहिती शोधत आहात का ? हो , तर मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात .
शालेय क्रीडा साहित्य मागणी पत्र या लेखामध्ये आज आपण क्रीडा साहित्याची मागणी करणारे पत्र कसे लिहायचे याचा नमुना पाहणार आहोत . मित्रांनो या लेखामध्ये दिलेले मागणी पत्र इयत्ता ८ वी , ९ वी , १० वी व इतर वर्गातील विद्यार्थी देखील वापरु शकतात .

Content
Show
शालेय क्रीडा साहित्य मागणी पत्र | Krida Sahitya Magni Patra In Marathi
प्रति , श्राव्या स्पोर्ट्स , सातारा. दिनांक :- २० जून 2022 विषय :- क्रीडा साहित्याची मागणी करणे बाबत . महोदय , नमस्कार , मी अभिषेक सणस . विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने पत्र लिहित आहे . आम्हांला शाळेमध्ये काही क्रीडा साहित्याची कमतरता भासत आहे . यासाठी आम्हांला काही क्रीडा साहित्य हवे आहे आहे . ते आम्हाला तुमच्या दुकानामधून हवे आहे . आम्ही नेहमी क्रीडा साहित्य हे तुमच्याच दुकानामधून घेत असतो . क्रीडा साहित्याची यादी खालीलप्रमाणे :- १) भाला :- १० २) थाळी :- १० ३) गोळा :- ५ ४) बास्केट बॉल :- ५ ५) हॉकी स्टिक :- १० वरील सर्व साहित्य खाली दिलेल्या शाळेच्या पत्त्यावर लवकरात लवकर पाठवावे व याचबरोबर या सर्व साहित्याचे बिल देखील या साहित्यासोबातच द्यावे अशी विनंती . सर्व साहित्य मिळताच , याची सर्व रक्कम दुकानाच्या नावे पाठविण्यात येईल . आपला विश्वासू , विद्यार्थी प्रतिनिधी , अभिषेक सणस , न्यू इंग्लिश स्कूल , सातारा .
आपण काय शिकलो ?
मित्रांनो या लेखामध्ये आज आपण ” शालेय क्रीडा साहित्याची मागणी करणारे पत्र ” पहिले . मित्रांनो शाळेसाठी क्रीडा साहित्याची मागणी करणारे पत्र हे आवडले असेल , तर तुमच्या मित्र – मैतीणींना देखील नक्कीच शेअर करा .
धन्यवाद …!
हे देखील वाचा :-
TEAM IN MARATHI LEKHAK