Lakudtodyachi-Gosht-in-Marathi-लाकूडतोड्याची-गोष्ट-मराठी-मध्ये

Lakudtodyachi Gosht in Marathi | लाकूडतोड्याची गोष्ट मराठी मध्ये

Uncategorized गोष्टी

मित्रांनो तुम्हांला देखील गोष्टी वाचायला आवडतात का ? आणि तुम्ही देखील ” लाकूडतोड्याची गोष्ट मराठी मध्ये ( Lakudtodyachi Gosht in Marathi ) ” शोधत असाल , तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात .

मित्रांनो या लेखामध्ये आज आपण प्रामाणिक लाकूडतोड्याची गोष्ट पाहणार आहोत . हि गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचा . मित्रांनो मला खात्री आहे , कि हि लाकूडतोड्या व देवदूत मराठी गोष्ट तुम्हांला नक्कीच आवडेल .

Lakudtodyachi-Gosht-in-Marathi-लाकूडतोड्याची-गोष्ट-मराठी-मध्ये
Lakudtodyachi-Gosht-in-Marathi-लाकूडतोड्याची-गोष्ट-मराठी-मध्ये

Lakudtodyachi Gosht in Marathi | लाकूडतोड्याची गोष्ट मराठी मध्ये

एका गावात रामू नावाचा गरीब लाकूडतोड्या राहत होता . जंगलातली झाडे तोडून ती विकून तो आपला गुजारा करायचा , त्याच्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी तो खूप काबाडकष्ट करायचा . तो रोज जवळच्या जंगलामध्ये जाऊन लाकडे तोडायचा आणि संध्याकाळपर्यंत परत येऊन तो ती विकायचा आणि यातून मिळणाऱ्या पैशांमधून आपल्या कुटुंबाचा खर्च भागवायचा . 

एकदा जंगलातल्या नदीजवळच्या झाडाची फांदी तोडत असताना , त्याच्या हातातली कुर्‍हाड निसटली आणि ती नदी मध्ये पडली . त्याने नदीमध्ये जाऊन बराच वेळ कुरड शोधण्याचा प्रयत्न केला . पण त्याला ती कुऱ्हाड परत मिळालीच नाही . दुःखी रामू नदीच्या काठी बसून विचार करीत होता . आता कुर्‍हाडी शिवाय लाकडं कशी तोडणार ? आणि जर लाकडी मिळाली नाहीत , तर माझ्या घरचा खर्च कसं चालणार ? तो अत्यंत दुःखी मनाने निसर्ग देवतेची प्रार्थना करू लागला , ” माझ्यावर कृपा कर आणि माझी कुराड मिळण्यासाठी माझी मदत कर ” , याची विनवणी ऐकुनी निसर्गदेवता त्याला प्रसन्न झाली . देवीला त्याच्यात दुःखाचे कारण समजले , ती नदीच्या पात्रामध्ये खोल पाण्यात गेली आणि एक सोन्याची कुराड घेऊन वर आली . ” अरे लाकूडतोड्या ही तुझी कुरड आहे का ?  ” असे निसर्ग देवतेने त्याला  विचारले , ” ही माझी कुर्‍हाड नाही ” , असे रामू म्हणाला . देवी पुन्हा पाण्यात गेली आणि पुन्हा चांदीची कुऱ्हाड घेऊन आली आणि लाकूडतोड्याला म्हणाली ” मग ही तुझी कुर्‍हाड आहे का ? ” तेव्हा रामू म्हणाला , ” ही पण माझी कुऱ्हाड नाही ” , यानंतर पुन्हा एकदा निसर्गदेवता नदीमध्ये कुर्‍हाड शोधण्यासाठी गेली . यावेळी बराच वेळ देवीने कुर्‍हाड शोधण्यास वेळ घालवला . यामुळे लाकूडतोड्याला वाटले की आपली कुर्‍हाड आता पुन्हा मिळणार नाही . तेवढ्यातच देवी लोखंडी कुऱ्हाड घेऊन पाण्यातून बाहेर आली . देवी लाकूडतोड्याला म्हणाली , ” ही तुझी कुऱ्हाड आहे का ? ” ही कुराड पाहून लाकूडतोड्याला खूप आनंद झाला . त्याच्या डोळ्यात पाणीच आले . ” होय देवी हीच माझी कुरड आहे ” , असे म्हटले त्याचे उत्तर ऐकून देवी त्याच्यावर प्रसन्न झाली . त्याचा निस्वार्थीपणा पाहून तिने त्याला त्याच्या कुर्‍हाडी सोबतच इतर दोन कुर्‍हाडी म्हणजेच सोन्याची आणि चांदीची कुराड देखील बक्षीस म्हणून दिली . ” तुझा खरेपणा पाहून मी खुश झाले , या दोन्ही कुराडी तू तुझ्याजवळ ठेव . ” असा आशीर्वाद देऊन ती देवी अदृश्य झाली . 

लाकूडतोड्या कुर्‍हाड घेऊन गावातील व्यापाऱ्यांकडे गेला आणि दोन्ही कुर्‍हाडी सोन्याची आणि चांदीची कुर्‍हाड विकण्यासाठी श्यामलाल नावाच्या व्यापाऱ्याकडे गेला . त्या दोन्ही कुर्‍हाडी पाहून , ” या कुऱ्हाडी तुला कुठे आणि कशा काय मिळाल्या ? ” असे श्यामलाल म्हणाला . यानंतर रामू ने घडलेली सर्व हकीकत त्या व्यापाऱ्याला सांगितली . व्यापाराच्या मनात लोभीपणा आला . 

शामलाल दुसऱ्या दिवशी जंगलात लोखंडी कुऱ्हाड घेऊन गेला आणि ती कुऱ्हाड त्याने नदीमध्ये टाकली आणि तो निसर्ग देवतेची प्रार्थना करू लागला . देवी प्रसन्न झाली . तो व्यापारी देवी ला म्हणाला , ” माझी कुऱ्हाड हातातून निसटली आणि पाण्यात पडली कृपा करून मला मदत कर .” त्याची प्रार्थना ऐकून देवी पाण्यात गेली आणि तिने सोन्याची कुराड बाहेर काढली . ” ही बघ ही तुझी कुर्‍हाड आहे का ? ” से देवी म्हणाली . त्या वेळी सोन्याची कुर्‍हाड पाहून व्यापाराच्या मनात लोभ उत्पन्न झाला आणि तो म्हणाला , ” हो , हो , हीच आहे माझी कुऱ्हाड . ” तो व्यापारी खोटे बोलत आहे . हे देवीला माहीत होतं तिला खूप राग आला . ” तू माझ्याशी खोटं बोललास तुला याची शिक्षा नक्कीच मिळेल , ” असे म्हणून देवी अदृश्य झाली . त्याला ती सोन्याची कुर्‍हाड मिळाली नाहीच , पण त्याने आणलेली लोखंडी कुर्‍हाड देखील तो गमावून बसला . म्हणूनच नेहमी आपण सत्य बोलावे .

तात्पर्य :- खरेपणा मुळे तुम्हाला नेहमीच फायदा होतो आणि खोटेपणा मुळे नुकसानच होते .

आपण काय शिकलो ?

मित्रांनो या लेखामध्ये आज आपण ” लाकूडतोड्याची गोष्ट मराठी मध्ये ( Lakudtodyachi Gosht in Marathi ) ” पहिली .

मित्रांनो हि गोष्ट आवडली असेल , तर तुमच्या इतर मित्र तसेच मैत्रिणींसोबत देखील नक्कीच शेअर करा आणि खालील बाजूला असलेल्या स्टार्स पैकी तुम्ही या लेखाला स्टार्स देऊ शकता .

हे देखील वाचा :-

धन्यवाद …!

TEAM IN MARATHI LEKHAK