मित्रांनो तुम्हांला देखील गोष्टी वाचायला आवडतात का ? आणि तुम्ही देखील ” लांडगा आला रे आला मराठी बोधकथा ( Landga Aala Re Aala Story In Marathi ) ” शोधत असाल , तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात .
मित्रांनो या लेखामध्ये आज आपण लांडगा आला रे लांडगा आला मराठी गोष्ट पाहणार आहोत . हि गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचा . मित्रांनो मला खात्री आहे , कि हि Landga Aala Re Aala Marathi Story तुम्हांला नक्कीच आवडेल .

लांडगा आला रे आला मराठी बोधकथा | Landga Aala Re Aala Story In Marathi
एक गाव होते . त्या गावांमध्ये एक शिरप्या नावाचा मेंढपाळ राहत होता . त्याला एकुलता एक मुलगा होता . त्याचे नाव सदू होते . एकुलता एक असल्यामुळे सदू वडिलांचा फार लाडका होता . पण वडिलांच्या फाजील लाड यामुळे तो थोडा बिघडला होता . दिवसभर उनाडक्या करण्यातच तो आपला वेळ वाया घालवत असे . वडिलांबरोबर मेंढ्या राखायला जाने , सदूला आवडत नसे आणि लाडका असल्यामुळे वडीलही त्याला बळजबरी करीत नसे .
एक दिवस असा आला , की शिरपाला तीन दिवसांसाठी बाहेरगावी जावे लागणार होते . त्यामुळे तो सदूला म्हणाला कि ” हे बघ सद्या मी तीन दिवसासाठी तालुक्याच्या गावाला जात आहे . हे तीन दिवस तुलाच मेंढरं घेऊन जावे लागणार आहे . मेंढरांवर नीट लक्ष ठेवायचं बरं का , जंगली जनावर हल्ला करतात . जंगली जनावर दिसलं की , लगेच गाव गोळा करायचा . आलं का ध्यानात . ” सदूने नाईलाजाने होकारार्थी मान डोलावली . सदू ठरलेल्या वेळी मेंढरांना घेऊन माळराणावर गेला . मेंढ्या गवत खाण्यात मग्न होत्या . सदू बाजूला झाडावर बसला होता . उनाडक्या करणार्या सदूला अस चुपचाप बसण्याचा भारी कंटाळा आला होता . तेव्हा त्याला आपल्या वडिलांनी सांगितलेली गोष्ट आठवली , ” एक गोष्ट ध्यानात ठेव बर का , जंगली जानवर आलं की लगेच ओरडून गाव गोळा करायचा . ” आपण ओरडल्यावर लोक खरंच गोळा होतात का ? हे पाहायची इच्छा झाली . म्हणून तो जोरजोरात ओरडायला लागला , ” लांडगा आला रे , लांडगा आला रे , लांडगा आला रे ” ऐकताच सगळे गावकरी हातातली कामे सोडून लांडग्याला पळवून लावण्यासाठी काहीजण भांडी बडवत आले , तर काही जण काट्या वगैरे घेऊन आले . गावकऱ्यांना धावत येताना पाहून सदूला फार मोठे हसायला आले . हे पाहून गावकरी म्हणाले , ” काय रे पोरा , कुठे आहे लांडगा ? ” त्यावेळेस सदू म्हणाला , ” लांडगा वगैरे काही आला नाही . मी तुमची परीक्षा घेत होतो , मी ओरडल्यावर तुम्ही येता की नाही , हे मी पाहत होतो . ” सदूच्या या वागण्याचा गावकऱ्यांना फार राग आला . पुन्हा असं न वागण्याचा सल्ला देऊन गावकरी निघून गेले .
दुसऱ्या दिवशी पुन्हा मेंढ्यांना चरण्यासाठी सोडून सदू झाडावर बसला . पुन्हा गावकर्यांची गंमत करायची त्याला लहर आली आणि तो पुन्हा मोठमोठ्याने ओरडू लागला , ” लांडगा आला रे , लांडगा आला रे , लांडगा आला रे ” हे ऐकल्यावर पुन्हा सगळे गावकरी गोळा झाले . या वेळी तो पुन्हा हसायला लागला . त्यामुळे गावकरी फार रागावले . गावकऱ्यांनी त्याला समज दिली आणि तेथून निघून गेले , तरी देखील याचा सदू वर काहीही परिणाम झाला नाही .
त्याने पुन्हा एकदा आवाज दिला . ” लांडगा आला रे , लांडगा आला रे , लांडगा आला रे ” पण यावेळी कोण हे गावकरी आले नाहीत . आपण लांडगा आला रे असे ओरडूनही गावकरी का आले नाही . या विचारात त्याला आता झोप येईना . आपण रोज – रोज लांडग्या वरूनच फसवतो , त्यामुळे लोक हुशार झाले . असावेत उद्या आपण वेगळी गंमत करू लांडग्या ऐवजी वाघाचे नाव घेऊन याच्यामुळे लोक नक्कीच फसवतील .
दुसऱ्या दिवशी सदू ओरडायला लागला , ” वाघ आला रे , वाघ आला रे , वाघ आला रे ” हे ऐकताच सर्व गावकरी काठ्या घेऊन भांडी वाजवत आवाजाच्या दिशेने धावू लागले . यावेळी देखील सदूला हसताना पाहून गावकरी अतिशय रागावले . यापुढे या खोटारड्या च्या मदतीला कधी यायचं नाही , ठरवून तिथून निघून गेले . गावकऱ्यांना फसवण्याचा फाजील आनंद हा सदूच्या चेहऱ्यावर दिसत होता .
मेंढ्या एकाएकी का ओरडायला लागल्या आहे हे पाहण्यासाठी सदूने आपली मान फिरवली . याने त्याची दातखीळ बसली . कारण त्याच्या समोरून खरोखरच एक वाघ त्याच्या मेंढरा ला घेऊन जात होता . सदू आता चांगलाच घाबरला . तो मोठमोठ्याने ओरडू लागला धावा धावा , वाचवा वाचवा , वाघ आला रे , धावारे वाघ आला , पण या वेळेस सदूच्या खोट्या बोलण्याला वैतागलेले कोणीही गावकरी त्याच्या मदतीला आले नाहीत . आपले खोटे बोलण्याची सदूला चांगली शिक्षा मिळाली होती .
तात्पर्य :- खोटे बोलल्याने नेहमी आपलेच नुकसान होते .
आपण काय शिकलो ?
मित्रांनो या लेखामध्ये आज आपण ” लांडगा आला रे आला मराठी बोधकथा ( Landga Aala Re Aala Story In Marathi ) ” पहिली .
मित्रांनो हि गोष्ट आवडली असेल , तर तुमच्या इतर मित्र तसेच मैत्रिणींसोबत देखील नक्कीच शेअर करा आणि खालील बाजूला असलेया स्टार्स पैकी तुम्ही या लेखाला स्टार्स देऊ शकता .
हे देखील वाचा :-
- आणखी मराठी गोष्टी वाचण्यासाठी येथे क्लिक करा .
- लोभी कुत्रा गोष्ट मराठीमध्ये
- उंदराची टोपी मराठी बोधकथा
- ससा आणि कासवाची शर्यत गोष्ट
- मुंगी आणि कबुतराची गोष्ट
धन्यवाद …!
TEAM IN MARATHI LEKHAK