मित्राला पत्र लेखन मराठी | मराठी पत्रलेखन नमुना

मित्राला पत्र लेखन मराठी | मराठी पत्रलेखन नमुना

पत्रलेखन

मित्राला पत्र लेखन मराठी | मराठी पत्रलेखन नमुना :- मित्रांनो या लेखामध्ये आज आपण Marathi Patra Lekhan Mitrala कशाप्रकारे लिहायचे हे आपण या लेखामध्ये पाहणार आहोत . याच लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी विविध प्रकारचे मराठी पत्र लेखन नमुना पाहणार आहोत . जेणेकरून तुम्हांला पत्रलेखन करणे सोपे जाईल .

मित्राला पत्र लेखन मराठी या लेखामध्ये आपण खालील मुद्द्यांवर पत्रलेखन पाहणार आहोत .

  1. चित्रकला स्पर्धेत मित्राचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
  2. विज्ञान प्रदर्शनात प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल तुमच्या मित्राचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
  3. तुमच्या वाढदिवसाचे आमंत्रण देण्यासाठी तुमच्या मित्राला पत्र लिहा.
  4. दिवाळीच्या सुट्टीत तुमच्या घरी बोलावण्यासाठी मित्राला पत्र लिहा.
  5. तुमच्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र लिहा.
  6. तुमच्या मित्राला निबंध स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं त्यासाठी अभिनंदन करणारे पत्र लिहा .
मित्राला पत्र लेखन मराठी | मराठी पत्रलेखन नमुना
मित्राला पत्र लेखन मराठी | मराठी पत्रलेखन नमुना
Content Show

मित्राला पत्र लेखन मराठी | मराठी पत्रलेखन नमुना

1. चित्रकला स्पर्धेत मित्राचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

प्रति ,
श्रवण पाटील ,
रुपनगर , शनिवार पेठ ,
सातारा , महाराष्ट्र .
दिनांक :- २० जून २०२२ 

प्रिय मित्र ,


आज मी जेव्हा शाळेत आलो त्यावेळेस फळ्यावर तुझे नाव पाहिले , त्याच्यानंतर तेथे काही जे लिहिले होते , ते सर्व वाचले . यानंतर मला फारच आनंद झाला . कारण तुझा चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला होता . हे सर्व वाचताच माझा आनंद गगनात मावेनासा झाला .

मला झालेला आनंद हा मी तुला शब्दांमध्ये सांगू शकत नाही . पण आज खऱ्या अर्थाने तुझी मेहनत केली , त्या मेहनतीचे यश तुला मिळालेच . कारण मला माहित आहे , की तू या स्पर्धेच्या आधी तिचे दिवस तू या स्पर्धेसाठी सराव करत होतास . 

ही बातमी मी घरी गेल्यावर आई-बाबांना देखील सांगितली . त्यांना देखील फार आनंद झाला आणि त्यांनी देखील तुझे खूप कौतुक केले . 

या पत्रातून तुला जास्त काही सांगणार नाही , पण तू जी मेहनत घेतली , त्या मेहनतीचे फळ तुला आज मिळाले . तू अशीच मेहनत पुढेही करीत राहा . तुला जे मिळवायचे आहे ते तू नक्की मिळवशील . तुला तुझ्या भावी वाटचालीस माझ्याकडून आणि घरातील सर्वच व्यक्तींकडून खूप खूप शुभेच्छा…!

तुझा जिवलग मित्र ,
अभी सणस 

2. विज्ञान प्रदर्शनात प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल तुमच्या मित्राचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

प्रति ,
श्रीतेज जाधव  ,
तेजस्वी नगर , रविवार पेठ ,
सातारा , महाराष्ट्र .
दिनांक :- २८ फेब्रुवारी २०२३  

प्रिय मित्र ,

मित्रा आज तुझे सर्वांच्या समोर पुढे बोलावून तुला विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल पारितोषिक दिले . यामुळे मी खूप खुश झालो . मला माहीतच होते , की या विज्ञान प्रदर्शनात तुझा ३ मधील एक नंबर ठरलेलाच आहे . कारण तू जे उपकरण बनवलेले होते . ते सर्वांत अनोखी होते . यामुळे तुझा नंबर येणारच याची मला खात्री होतीच . 

तू पुढे असेच यश मिळवत राहा आणि तुझ्या सोबतच तुझ्या आई वडिलांचे नाव देखील मोठे कर . एवढीच माझी इच्छा आहे आणि मला नक्कीच खात्री आहे , की तू तुझ्या आई वडिलांचे नाव नक्कीच मोठे करशील . 

तुला तुझ्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा….!

तुझा मित्र ,
अभी सणस 

3. तुमच्या वाढदिवसाचे आमंत्रण देण्यासाठी तुमच्या मित्राला पत्र लिहा.

प्रति ,
ओम पाटील ,
रूप नगर , बुधवार पेठ ,
सातारा , महाराष्ट्र .
दिनांक :- १४ ऑक्टोबर २०२२   

प्रिय मित्र ,

ओम तुला तर माहीतच आहे की माझा वाढदिवस जवळ आलेला आहे , तर या माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या घरी वाढदिवस साजरा केला जाणार आहे . या वाढदिवसासाठी आपले बरेचसे मित्र देखील येणार आहेत , तरी तू देखिले या वाढदिवसाच्या दिवशीं घरी नक्की ये . 

कारण बरेचसे मित्र देखील माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी घरी येणार आहेत आणि माझी देखील अशीच इच्छा आहे , की तू देखील या वाढदिवसाला साठी यावेस . मला खात्री आहे की मी पत्र पाठवले आहे म्हटल्यावर तू नक्की येशील .

मित्र बघ वाढदिवसाच्या बरेच दिवस आधी तुला मी पत्र पाठवले आहे . तुला नक्कीच माझ्या वाढदिवसा साठी यावेच लागेल .

तुझा लाडका मित्र ,
अभी सणस 

4. दिवाळीच्या सुट्टीत तुमच्या घरी बोलावण्यासाठी मित्राला पत्र लिहा.

प्रति ,
आदित्य पाटील ,
काळे बिल्डींग ,
२०७७ डी वार्ड ,
सातारा , महाराष्ट्र .
दिनांक :- १७ ऑक्टोबर २०२२   

प्रिय मित्र ,

आदित्य बघ आता थोड्याच दिवसात आपले पेपर संपून आपल्याला दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहेत , तर दिवाळीच्या सुट्टीमध्ये माझी अशी इच्छा आहे , की तू आमच्या घरी दिवाळीच्या सुट्ट्या मध्ये राहायला यावेस .

कारण मी दिवाळीच्या सुट्टीमध्ये गावी राहायला जाणार आहे तू जर माझ्यासोबत आलास , तर आपण तिथे फार मजा मस्ती करूया . याच बरोबर तुला देखील आमचे गाव पाहायचे होते ना ते देखील पाहून होईल .

त्याचबरोबर सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तुला आवडणारे आनारसे देखील माझी आई बनणार आहे . तू जर आमच्या सोबत दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी राहायला आलास , तर मला देखील फार आनंद होईल .

तू जर माझ्यासोबत येणार असशील , तर मला नक्की कळव .
 मी तुझा पत्राची वाट पाहतोय .

तुझा प्रिय मित्र ,
अभी सणस 

5. तुमच्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र लिहा.

प्रति ,
रोहित पाटील ,
रूप नगर , बुधवार पेठ ,
सातारा , महाराष्ट्र .
दिनांक :- 2 मे २०२३ 

प्रिय मित्र ,

रोहित तुझा आता वाढदिवस जवळ आलेला आहे . मी आधीच पत्र लिहीत आहे . तेव्हा आता तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो .

माझा अभ्यास चालू असल्या कारणाने , मला तुझ्या वाढदिवसानिमित्त घरी यायला जमणार नाही . यामुळे मी तुला पत्राद्वारे शुभेच्छा पाठवत आहे . या शुभेच्छांचा तू स्वीकार कर व कोणताही राग मानून घेऊ नकोस . ज्यावेळी मी सुट्टी लागल्यावर घरी परत येईल , त्यावेळी आपण तुझ्या वाढदिवसानिमित्त एक मोठी पार्टी देखील नक्कीच करूया .

मला माहित नाही कि हे पत्र नक्की तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी पोहोचेल किंवा त्याच्यानंतर पोहोचेल . तू कसलाही राग मानू नकोस , आपण तुझ्या पुढच्या वाढदिवसाला नक्कीच खूप मजा करू या .

तुझा मित्र ,
अभी सणस 

६. तुमच्या मित्राला निबंध स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं त्यासाठी अभिनंदन करणारे पत्र लिहा .

प्रति ,
अभिजित पाटील ,
रूप नगर , बुधवार पेठ ,
सातारा , महाराष्ट्र .
दिनांक :- 17 फेब्रुवारी २०२३ 

प्रिय मित्र ,

मित्रा मला आज घरी आल्यानंतर फोन द्वारे कळले , की तुझा निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आणि याचे तुला पारितोषिक देखील मिळाले . हे ऐकताच मला फार आनंद झाला . ही गोष्ट मी लगेच आपल्या इतर मित्रांना तसेच माझ्या आई-वडिलांना आणि दीदीला देखील सांगितली . सर्वांना फारच आनंद झाला व सर्वांनी तुझे खूप कौतुक केले . 

तुझा निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला , कारण तुझे हस्ताक्षर , तसेच तुझे विचार देखील खूप सुंदर आहेत . कारण तुझे वाचन देखील फार आहे . तू पुढेही असेच प्रयत्न करत राहा आणि यश मिळवत राहा . तू एक दिवस तुझे तुझ्या आई वडिलांचे व तुझ्या गुरूंचे नाव नक्कीच मोठे करशील , याची मला खात्री आहे . 

तुला तुझ्या पुढील वाटचालीस माझ्याकडून व माझ्या सर्व परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा..!

तुझा जिवलग मित्र ,
अभी सणस 

आपण काय शिकलो ?

मित्राला पत्र लेखन मराठी | मराठी पत्रलेखन नमुना मित्रांनो या लेखामध्ये आज आपण Marathi Patra Lekhan Mitrala कशाप्रकारे लिहायचे हे आपण या लेखामध्ये पहिले . याच लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी विविध प्रकारचे मराठी पत्र लेखन नमुना देखील पहिला .

मित्राला पत्र लेखन मराठी | मराठी पत्रलेखन नमुना
मित्राला पत्र लेखन मराठी | मराठी पत्रलेखन नमुना

मराठी पत्रलेखन नमुना आवडला असेल , तर एक कॉमेंट करून नक्कीच कळवा . तसेच तुमच्या इतर मित्र तसेच मैत्रीणीना देखील नक्कीच शेअर करा . जेणेकरून त्यांना मराठी पत्रलेखन करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही .

हे देखील नक्की वाचा :-

धन्यवाद ..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *