पत्र लेखन मराठी प्रकार | Letter Writing in Marathi

पत्र लेखन मराठी प्रकार | Letter Writing in Marathi

पत्रलेखन

Letter Writing in Marathi | Patra Lekhan Marathi :- या लेखामध्ये आपण ” मराठी पत्रलेखन ” कशाप्रकारे करायचे ? हे आपण या लेखामध्ये शिकणार आहोत . याचबरोबर यात आपण ” Marathi Letter Writing Format ” आणि ” मराठी पत्रलेखन नमुना ” देखील पाहणार आहोत .

पत्र लेखन मराठी या लेखामध्ये आपण पत्रलेखन कसे करायचे ? पत्रलेखनाचे प्रकार कोणते ? याचबरोबर मराठी पत्रलेखन नमुना हे देखील या लेखामध्ये आपण पाहणार आहोत .

पत्र लेखन मराठी प्रकार | Letter Writing in Marathi
पत्र लेखन मराठी प्रकार | Letter Writing in Marathi

पत्र लेखन मराठी प्रकार | Letter Writing in Marathi

मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण ” Letter Writing in Marathi ” म्हणजेच ” पत्र लेखन मराठी ” पाहणार आहोत . हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा . मित्रानो काही वेळेस परीक्षेच्या वेळी पेपरमध्ये पत्रलेखन या विषयी काही प्रश्न आला , तर काही विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर लिहिता येत नाही . खास करून त्यांच्यासाठी आपण हा लेख घेऊन आलो आहोत . जेणेकरून त्यांना पेपर मध्ये हा प्रश्न आला , त्याचे उत्तर विद्यार्थी लिहू शकतील आणि त्यांचे पत्रलेखनाचे गुण त्यांना मिळतील . मित्रांनो हे पत्र लेखन मराठी 9वी आणि पत्र लेखन मराठी 10वी याचबरोबर इतर सर्व वर्गांसाठी वापरू शकता .

पत्र म्हणजे काय ?

पत्र हे एक संदेश पाठवण्याचे साधन तसेच माध्यम आहे . पत्र हे एक असे संदेश पाठवायचे साधन आहे , कि याच्या मदतीने आपण आपल्या एखाद्या व्यक्ती विषयीच्या भावना भावना शब्दाद्वारे व्यक्त करू शकतो . पूर्वीच्या काळी पत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जायचा , पण आता आधुनिक काळामध्ये मोबाईल चा वापर वाढल्यामुळे आता पत्राच्या जागी मोबाईल वरूनच मेसेज किंवा इमेल पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या जातात .

पत्र लेखन मराठी प्रकार किती आणि कोणते ?

मराठीमध्ये पत्रलेखनाचे २ प्रकार आहेत.

पत्र लेखन मराठी प्रकार खालीलप्रमाणे :-

  1. औपचारिक पत्र
  2. अनौपचारीक पत्र

औपचारीक पत्र अनौपचारीक पत्र
१) प्रति लिहिल्यानंतर व्यक्तीचा संपर्क हुद्द लिहावा .१) व्यक्तीचा उल्लेख योग्य , नात्याप्रमाणे , सन्मान पूर्वक करावा .
२) पत्राचा विषय लिहावा .२) व्यक्तीची खुशाली विचारावी .
३) अचूक शब्दांत नेमका आशय मांडावा .३) भावना प्रभावी शब्दांत मांडाव्यात .
४) पत्राच्या शेवटी डावीकडे पत्र पाठविणार्याचे नाव आणि पत्ता लिहावा .४) नात्यातील जीव्हाल्यानुसार सविस्तर लेखन करावे .
५) पत्राचा विषय लिहिण्याची गरज नाही .
६) पत्राच्या शेवटी डावीकडे पत्र पाठविणार्याचे नाव आणि पत्ता लिहावा .
मराठीमध्ये पत्रलेखनाचे प्रकार

1. औपचारीक पत्र | Formal Letter in Marathi

मित्रांनो औपचारीक पत्र (Formal Letter in Marathi ) म्हणजे , जे पत्र आपण व्यावसायिक किंवा कार्यालयीन कामांसाठी लिहितो यालाच ” औपचारीक पत्र किंवा ” Formal Letter असे म्हटले जाते .

औपचारीक पत्रांचे प्रकार

  • तक्रार अर्ज
  • प्रार्थना अर्ज
  • आमंत्रण पत्र
  • चौकशी पत्र
  • नोकरीसाठी अर्ज
  • कार्यालयीन कामकाजासाठीचे पत्र
  • व्यवसायिक कामासाठीचे पत्र

औपचारीक पत्राचा आराखडा | Marathi Formal Letter Writing Format

[ पत्र स्वीकारणाऱ्याचे नाव ,
पत्ता लिहावा . ]
दिनांक :- 2 जून 2022         { दिनांक याच फोर्मेट मध्ये }

विषय :- [ येथे पत्रलेखनाचा विषय कमीत-कमी शब्दांत लिहावा . ]

माननीय/आदरणीय , महोदय/महोदया ,

[ येथे पत्राचा मजकूर लिहिण्यास सुरुवात करावी . ] 
______________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________

आपला कृपाभिलाषी किंवा आपला विश्वासु ,
[ पत्र लिहिणाऱ्याचे नाव ,
पत्ता     ]

औपचारीक पत्राचे नमुने

शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा .
---------------------------------------------

प्रति ,
सरस्वती बुक डेपो ,
सातारा .
दिनांक :- २ जून 2022

विषय :- शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणे बाबत .

महोदय ,
मी न्यू इंग्लिश स्कूल , सातारा चा विद्यार्थी आहे . आमच्या शालेय ग्रंथालयामध्ये काही पुस्तकांची उणीव भासत आहे . हि पुस्तके आम्हांला लवकरात लवकर हवी आहेत .
पुस्तकांची यादी खालीलप्रमाणे :-

१) मृत्युंजय                 - १० पुस्तके 
२) मराठी बालगीते     - १० पुस्तके 
३) मराठी सुविचार      - १० पुस्तके 
४) मराठी व्याकरण   - २० पुस्तके 
५) इंग्रजी व्याकरण   - २० पुस्तके 

वरील सर्व पुस्तके व या पुस्तकांचा बिल खालील पत्त्यावर पाठवावा . सर्व पुस्तके मिळताच धनादेश दुकानाच्या नावे पाठविण्यात येईल . या पुस्तकांच्या किमतीमध्ये सवलत द्यावी अशी विनंती .
आपला विश्वासू ,
अभी जाधव ,
न्यू इंग्लिश स्कूल ,
सातारा .

2. अनौपचारीक पत्र | Informal Letter in Marathi

मित्रांनो अनौपचारीक पत्र (Informal Letter in Marathi) म्हणजे , जे पत्र आपल्या आई-वडील , बहिण – भाऊ , कुटुंबातील सदस्य , तसेच आपले नातेवाईक यांना लिहित असतो . त्या पत्रांना ” अनौपचारीक पत्र किंवा ” Informal Letter असे म्हणतात .

प्रति ,
[ पत्र स्वीकारणाऱ्याचे नाव ,
पत्ता ,
इत्यादी येथे लिहावे .] 
दिनांक :- 2 जून 2022           { दिनांक याच फोर्मेट मध्ये }


[ मायना ]

[ येथे पत्राचा मजकूर लिहिण्यास सुरुवात करावी . ] 
______________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________

[ नाते जे काही असेल ते , जसे तुझा भाऊ किंवा तुझी बहिण ]
[ पत्र पाठवणाऱ्याचे नाव ,
पत्ता     ]

अनौपचारीक पत्राचे नमुने

तुमच्या लहान भावाचा किंवा बहिणीचा धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल अभिनंदन पत्र लिहा.
-------------------------------------------------------------------

प्रति,
स्वरा जाधव ,
रामनगर , रविवार पेठ ,
सातारा .
दिनांक :- २ जून २०२२ 

प्रिय दिदु ,

दीदी मी आज अभ्यास करताना , पप्पांचा फोन आला . मला त्यांनी तुझा धावण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आल्याचे सांगितले . तुझा प्रथम क्रमांक आला हे समजताच मला फार आनंद झाला , हे शब्दांत नाही सांगू शकत . माझा आनंद हा गगनात मावेनासा झाला . 

मी लगेचच तुझा धावण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला आहे , हे लगेचच माझ्या मित्र-मैत्रिणींना देखील सांगितले . त्यांना देखील फार आनंद झाला . त्यांनी देखील तुझे फार कौतुक केले .

तू इथून पुढे देखील असेच पर्यंत करत राहा आणि खूप सारे यश मिळवत राहा . मला खात्री आहे , कि आपल्या आई-वडिलांचे नाव नक्कीच मोठे करशील . तुला तुझ्या पुढील वाटचालीस खूप-खूप शुभेच्छा .

तुझाच लाडका दादा ,
अभी जाधव .

पत्र लिहिताना कोणती काळजी घ्यायची ?

  • सर्वप्रथम पत्रलेखन करताना कृतीमध्ये दिलेला मजकूर पूर्णपणे वाचून व्यवस्तीत समजून घ्यावा .
  • दिलेल्या माहितीमध्ये कोणत्या विषयावर पत्रलेखन करायचे आहे , हे व्यवस्तीत समजून घ्यावे .
  • या मध्ये कोणता व्यक्ती पत्र लिहित आहे ? याचबरोबर तो कशासाठी लिहित आहे ? आणि कोणाला लिहित आहे ? हे लक्षात घ्यावे .
  • मजकुरामध्ये दिलेल्या विषयाला अनुसरून सोप्या शब्दांत सुटसुटीत लेखन करावे .
  • पत्रलेखन करताना मुक्या मजकुराचे तीन परिच्छेद करावे .
  • पत्राच्ये शेवट करताना आपला कृपाभिलाषी , आपला विश्वासू या शब्दांनी करावा किंवा जे कृतीपात्रीकेमध्ये दिलेले नाव पत्ता यांच्या नुसार लिहावे .
  • याचबरोबर पत्राच्या शेवटी मजकुरामध्ये दिलेले नाव , पत्ता व एखादा काल्पनिक इमेल आयडी लिहावा .

वर दिलेले सर्व मुद्दे विचारात घेऊन पत्रलेखन करावे .

पत्र लेखन मराठी प्रकार | Letter Writing in Marathi
पत्र लेखन मराठी प्रकार | Letter Writing in Marathi

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

मराठीमध्ये पत्रलेखनाचे प्रकार कोणते ?

मराठीमध्ये पत्रलेखनाचे प्रकार खालीलप्रमाणे :-
१)औपचारीक पत्र (Formal Letter in Marathi )
२)अनौपचारीक पत्र (Informal Letter in Marathi )

औपचारीक पत्र (Formal Letter in Marathi ) म्हणजे काय ?

मित्रांनो औपचारीक पत्र (Formal Letter in Marathi ) म्हणजे , जे पत्र आपण व्यावसायिक किंवा कार्यालयीन कामांसाठी लिहितो यालाच ” औपचारीक पत्र ” किंवा ” Formal Letter  असे म्हटले जाते .

अनौपचारीक पत्र (Informal Letter in Marathi ) म्हणजे काय ?

मित्रांनो अनौपचारीक पत्र (Informal Letter in Marathi) म्हणजे , जे पत्र आपल्या आई-वडील , बहिण – भाऊ , कुटुंबातील सदस्य , तसेच आपले नातेवाईक यांना लिहित असतो . त्या पत्रांना ” अनौपचारीक पत्र ” किंवा ” Informal Letter ” असे म्हणतात .

पत्र म्हणजे काय ?

पत्र हे एक संदेश पाठवण्याचे साधन तसेच माध्यम आहे . पत्र हे एक असे संदेश पाठवायचे साधन आहे , कि याच्या मदतीने आपण आपल्या एखाद्या व्यक्ती विषयीच्या भावना भावना शब्दाद्वारे व्यक्त करू शकतो . पूर्वीच्या काळी पत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जायचा , पण आता आधुनिक काळामध्ये मोबाईल चा वापर वाढल्यामुळे आता पत्राच्या जागी मोबाईल वरूनच मेसेज किंवा इमेल पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या जातात .

औपचारीक पत्रांचे प्रकार कोणते ?

1) तक्रार अर्ज
2) प्रार्थना अर्ज
3) आमंत्रण पत्र
4) चौकशी पत्र
5) नोकरीसाठी अर्ज
6) कार्यालयीन कामकाजासाठीचे पत्र
7) व्यवसायिक कामासाठीचे पत्र

आपण काय शिकलो ?

Letter Writing in Marathi म्हणजेच पत्र लेखन मराठी प्रकार ( Patra Lekhan Marathi ) या लेखामध्ये आज आपण पत्राचे दोन प्रकार कोणते आहे ? याचबरोबर या दोन्ही प्रकारांमध्ये पत्रलेखन कशाप्रकारे करायचे ? याचा आपण पत्रलेखन नमुना देखील पहिला .

मित्रांनो मी आशा करतो कि , तुम्हांला Informal Letter in Marathi New Format , तसेच Formal Letter in Marathi New Format हे दोन्ही व्यवस्तीत समजले असेल .

मित्रांनो हे पत्र लेखन मराठी 9वी आणि पत्र लेखन मराठी 10वी याचबरोबर इतर सर्व वर्गांसाठी वापरू शकता .

धन्यवाद …!

आणखी वाचा :-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *