Lobhi Kutra Marathi Goshta | लोभी कुत्रा गोष्ट मराठीमध्येLobhi Kutra Marathi Goshta | लोभी कुत्रा गोष्ट मराठीमध्ये

मित्रांनो तुम्हांला देखील गोष्टी वाचायला आवडतात का ? आणि तुम्ही देखील ” लोभी कुत्रा गोष्ट मराठीमध्ये ( Lobhi Kutra Marathi Goshta ) ” शोधत असाल , तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात .

मित्रांनो या लेखामध्ये आज आपण लोभी कुत्रा गोष्ट तात्पर्य पाहणार आहोत . हि गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचा . मित्रांनो मला खात्री आहे , कि हि लोभी कुत्रा गोष्ट इयत्ता दुसरी च्या विद्यार्थ्यांना देखील नक्कीच आवडेल .

Lobhi Kutra Marathi Goshta | लोभी कुत्रा गोष्ट मराठीमध्ये
Lobhi Kutra Marathi Goshta | लोभी कुत्रा गोष्ट मराठीमध्ये

Lobhi Kutra Marathi Goshta | लोभी कुत्रा गोष्ट मराठीमध्ये

एक गाव होते . त्या गावामध्ये एक कुत्रा राहत होता . एके दिवशी त्याला खूप भूक लागली होती . तो धावत धावत निघाला होता . त्याला वाटेमध्येच एक भाकरी मिळाली . वाटेमध्ये भाकरी पाहून हा कुत्रा फार आनंदित झाला . त्याच्या तोंडाला पाणी सुटले . त्याने इकडे – तिकडे पाहीले कोणी दिसते का ? पण त्याला कोणीही दिसले नाही .  त्याला खूप आनंद वाटला . त्याने ती भाकरी उचलली आणि तो धावत निघाला . तो धावत – धावत चालला होता . त्याने एका ठिकाणी एकांतात जाऊन भाकरी खाण्याचा विचार केला . तो खूप आनंदित झाला होता . 

तो धावत धावत एका नदी जवळ पोहोचला आणि नदीच्या पुलावरून जात असताना त्याला पाण्यामध्ये दुसरा एक कुत्रा दिसला आणि त्याला वाटले , “ अरे वा ! दूसरा कुत्रा आहे . त्याच्या तोंडामध्ये सुद्धा भाकरी आहे . मी ही भाकरी हिसकावून घेतली पाहिजे . मला देखील खूप भूक लागलेली आहे . “ असा त्याने विचार केला . 

आता त्याला एक नव्हे दोन भाकरी खायला भेटणार होत्या . म्हणून तो विचार करू लागला . तो लगेच पाण्यामध्ये  असलेल्या कुत्र्यावर भुंकायला लागला . भुंकल्याबरोबर त्याच्या तोंडामध्ये असलेली भाकरी पटकन पाण्यामध्ये पडली . याच्या नंतर त्याच्या लक्षात आले , की पाण्यामध्ये दुसरा इतर कोणताही कुत्रा नसून ते आपलेच प्रतिबिंब होते . 

त्याच्या या लोभीपणा मुळे त्याच्याकडे असलेली भाकरी देखील त्याला मिळाली नाही आणि तो उपाशीच तिथून निघून गेला .

तात्पर्य :- आपल्याकडे जे आहे , त्यामध्येच समाधान मानले पाहिजे .

आपण काय शिकलो ?

मित्रांनो या लेखामध्ये आज आपण ” लोभी कुत्रा गोष्ट मराठीमध्ये ( Lobhi Kutra Marathi Goshta ) ” पहिली .

मित्रांनो हि गोष्ट आवडली असेल , तर तुमच्या इतर मित्र तसेच मैत्रिणींसोबत देखील नक्कीच शेअर करा आणि खालील बाजूला असलेल्या स्टार्स पैकी तुम्ही या लेखाला स्टार्स देऊ शकता .

हे देखील वाचा :-

धन्यवाद …!

TEAM IN MARATHI LEKHAK