मागणी पत्र लेखन मराठी 2022 :- या लेखामध्ये आपण विविध प्रकारचे ” Magni Patra Lekhan in Marathi With Examples ” म्हणजेच ” मागणी करणारे पत्र लेखन मराठी 2022 ” पाहणार आहोत .

मागणी पत्र लेखन मराठी 2022 या लेखामध्ये आपण खालील पत्रलेखनाचे नमुने पाहणार आहोत .

  1. शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा .
  2. क्रीडा साहित्यची मागणी करणारे पत्र लिहा .
  3. शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी पत्र लिहा .
  4. विज्ञान प्रयोगशाळेसाठी लागणाऱ्या उपकरणांची मागणी करणारे पत्र लिहा .
  5. वाढदिवसासाठी भेटवस्तू मागवणारे पत्र लिहा .
मागणी पत्र लेखन मराठी 2022 | Magni Patra Lekhan in Marathi With Examples
मागणी पत्र लेखन मराठी 2022 | Magni Patra Lekhan in Marathi With Examples

 

मागणी पत्र म्हणजे काय ?

 

मित्रांनो मागणी पत्र म्हणजे , ज्या पत्रामध्ये आपण एखाद्या वस्तूची मागणी केली जाते . त्या पत्राला ” मागणी पत्र ” असे म्हणतात .

 

मागणी पत्र लेखन मराठी 2022 | Magni Patra Lekhan in Marathi

 

१. शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा .

प्रति ,
पारिजातक बुक डेपो ,
सातारा .
17 जून 2022

विषय :-  शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकाची मागणी करणे बाबत .

महोदय ,

मी न्यू इंग्लिश स्कूल सातारा या विद्यालयातील एक विद्यार्थी प्रतिनिधी आहे . आमच्या विद्यालयातील ग्रंथालयांमध्ये काही पुस्तकांचा आभाव आहे . ही पुस्तके आम्हाला लवकरात लवकर हवी आहेत .

पुस्तकांची यादी खालील प्रमाणे :-


१) राजा शिवछत्रपती
२) अग्निपंख
३) गुलामगिरी
४) मुसाफिर
५) प्रेरनदायी गोष्टींची पुस्तके 

वरील सर्व पुस्तके व यांच्याबरोबर या पुस्तकांचा बिल शाळेच्या पत्त्यावर पाठविण्यात यावा अशी विनंती . याच बरोबर या बिलावर काही टक्के सवलत द्यावी अशी विनंती आहे . पुस्तके मिळताच धनादेश तुमच्या पत्त्यावर पाठविण्यात येईल .

आपला कृपाभिलाषी ,
विद्यार्थी प्रतिनिधी ,

अभी जाधव
न्यू इंग्लिश स्कूल ,
सातारा.

२. क्रीडा साहित्यची मागणी करणारे पत्र लिहा .

प्रति ,
अभी स्पोर्ट्स ,
सातारा.
दिनांक :- 3 जून 2022

विषय :- क्रीडा साहित्याची मागणी करणे बाबत .

महोदय , 

मी न्यू इंग्लिश स्कूल सातारा या विद्यालयातील विद्यार्थी आहे . विद्यार्थी प्रतिनिधी असल्याकारणाने मी हे पत्र लिहीत आहे . आमच्या शाळेमध्ये मुलांना काही क्रीडा साहित्याची उणीव भासत आहे . ही क्रीडा साहित्य म्हणला तुमच्या दुकानातून घ्यावयाचे आहेत .

क्रीडा साहित्याची यादी खालीलप्रमाणे :-


१) गोळा 
२) थाळी 
३)भाला 
४) हॉकी स्टिक
५) बास्केट बॉल

वरील सर्व क्रीडा साहित्य खालील पत्त्यावर लवकरात लवकर पाठवावे अशी विनंती , तसेच साहित्याबरोबरच या क्रीडा साहित्याचे बिल पाठवून द्यावे . सर्व साहित्य मिळताच बिल दुकानाचे नावे पाठविण्यात येईल .

आपला विश्वासू ,
विद्यार्थी प्रतिनिधी 

श्र्यावा पाटील 
न्यू इंग्लिश स्कूल ,
सातारा .

३. शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी पत्र लिहा .

प्रति ,
ग्रीन वल्ड रोपवाटिका  ,
सातारा.
दिनांक :- 3 जुलै 2022

विषय :- रोपांची मागणी करणे बाबत .

महोदय ,

मी न्यू इंग्लिश स्कूल सातारा या विद्यालयांमध्ये शिकत असलेला विद्यार्थी आहे . आम्ही शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेणार आहोत . जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वृक्षारोपण या विषयी आवड निर्माण व्हावी व त्यांनी देखील वृक्षारोपण करावे व त्यांचे जतन देखील करावे . यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेणार आहोत . या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आम्हांला काही रोपांची आवश्यकता आहे . ही रोपे आम्हाला तुमच्याकडून हवी आहेत .

रोपांची यादी खालील प्रमाणे :-


१) वड 
२) पिंपळ 
३)चिंच 
४) पेरू 
५) सीताफळ
६) जांभूळ 
७) नारळ 
८) गुलमोहर 
९) अशोक 
१०) चाफा 

हि वरील सर्व रोपे खाली दिलेल्या शाळेच्या पत्त्यावर लवकरात लवकर पोहोचवावेत व याच सोबत यांचा बिल देखील पाठवावा सर्व रोपे मिळताच बिलाचे पैसे दुकानाचे नावे पाठवण्यात येतील

आपला कृपाभिलाषी
विद्यार्थी प्रतिनिधी,
अभी जाधव 
न्यू इंग्लिश स्कूल ,
सातारा .

४. विज्ञान प्रयोगशाळेसाठी लागणाऱ्या उपकरणांची मागणी करणारे पत्र लिहा .

प्रति , 
अक्षय स्टोअर्स  , 
सातारा. 
दिनांक :- 3 ऑगस्ट 2022

विषय :- विज्ञान प्रयोगशाळेसाठी लागणाऱ्या उपकरणांची मागणी करणे बाबत .

महोदय ,

आमच्या विद्यालयामधील प्रयोगशाळेमध्ये उपलब्ध असलेले साहित्य हे जुने झाले आहे . तसेच काही साहित्य फुटले देखील आहे . यामुळे विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेमध्ये प्रात्यक्षिके करताना थोडा त्रास जाणवत आहे . यासाठी आम्हाला काही उपकरणांची आवश्यकता आहे . ही उपकरणे आम्हाला तुमच्याकडून हवी आहेत .

उपकरणांची यादी खालील प्रमाणे :-

१) परीक्षा नळी
२) चाचणी ट्यूब धारक
३) टेस्ट ट्यूब स्टँड
४) फनेल
५) ग्लास फनेल
६) रबर स्टॉपर
७) अभिकर्मक बाटली
८) बाष्पीभवन डिश
९) कंडेन्सर
१०) कव्हरसह क्रूसिबल
११) डेसिकेटर
१२) स्पॅटुला
१३) ढवळत रॉड
१४) विभक्त फनेल
१५) पीएच मीटर
१६) बुरेटे
१७) बुरेट क्लॅंप
१८) बुचनेर फनेल
१९) पाइपेट
२०) चाचणी ट्यूब रॅक

ही सर्व उपकरणे आपल्या शाळेच्या पत्त्यावर पाठवावे , तसेच या उपकरणांचे बिल देखील उपकरणां सोबतच पाठवून द्यावे . अशी विनंती सर्व उपकरणे मिळताच या उपकरणांचे बिलाचे पैसे तुमच्या दुकानाचे नावे पाठविण्यात येईल .

तुम्हाला एक विनंती आहे की , या सर्व उपकरणांवर काही टक्के सवलत द्यावी .

आपला विश्वासू ,
विद्यार्थी प्रतिनिधी ,
अभी जाधव
न्यू इंग्लिश स्कूल ,
सातारा .

५. वाढदिवसासाठी भेटवस्तू मागवणारे पत्र लिहा .

प्रति , 
धनश्री स्टोअर्स  , 
सातारा. 
दिनांक :- २५ ऑगस्ट 2022

विषय :- वाढदिवसासाठी भेटवस्तूची मागणी करणे बाबत .

महोदय ,

नमस्कार मी एक गोकुळधाम सोसायटीमधील रहिवाशी आहे . मला माझ्या मैत्रिणीला वाढदिवसासाठी भेटवस्तू द्यायची आहे . हि भेटवस्तू आम्हांला तुमच्या स्टोअर्स मधून हवी आहे . 

भेटवस्तू म्हणून एक सुंदर असे घड्याळ मला भेट द्यायचे आहे . मला माहित आहे , कि तुमच्याकडे विविध प्रकारची सुंदर अशी घड्याळे देखील मिळतात . हि भेटवस्तू आणि याचे तुम्ही खाली दिलेल्या पत्त्यावर लवकरात लवकर पोहोचावा अशी विनंती .

हि भेटवस्तू मिळताच याचे पैसे तुम्हांला दुकानाच्या नावे पाठविण्यात येईल .

आपला विश्वासू ,
विद्यार्थी प्रतिनिधी ,
अभी जाधव
गोकुळधाम सोसायटी ,
सातारा .

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

मागणी पत्र म्हणजे काय ?

मित्रांनो मागणी पत्र म्हणजे , ज्या पत्रामध्ये आपण एखाद्या वस्तूची मागणी केली जाते . त्या पत्राला ” मागणी पत्र ” असे म्हणतात .

मागणी पत्रांची उदाहरणे कोणती ?

१) शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा .
२) क्रीडा साहित्यची मागणी करणारे पत्र लिहा .
३) शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी पत्र लिहा .
४) विज्ञान प्रयोगशाळेसाठी लागणाऱ्या उपकरणांची मागणी करणारे पत्र लिहा .

 

आपण काय शिकलो ?

मागणी पत्र लेखन मराठी 2022 ( Magni Patra Lekhan in Marathi With Examples ) या लेखामध्ये आपण खालील नमुन्यांवर पत्रलेखन पहिले .

  1. शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा .
  2. क्रीडा साहित्यची मागणी करणारे पत्र लिहा .
  3. शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी पत्र लिहा .
  4. विज्ञान प्रयोगशाळेसाठी लागणाऱ्या उपकरणांची मागणी करणारे पत्र लिहा .

मित्रांनो मागणी पत्र लेखन मराठी 2022 ( Magni Patra Lekhan in Marathi With Examples ) या लेखामध्ये दिलेले मागणी पत्र इयत्ता नववी तसेच हे मागणी पत्र इयत्ता दहावी साठी वापरले तरी चालेल किंवा इतर कोणत्याही वर्गातील विध्यार्थ्याने वापरले तरी चालेल .

मागणी पत्र लेखन मराठी 2022 | Magni Patra Lekhan in Marathi With Examples
मागणी पत्र लेखन मराठी 2022 | Magni Patra Lekhan in Marathi With Examples

मित्रांनो मागणी पत्र लेखन आवडले असेल , तर कॉमेंट करून नक्कीच कळवा . याचबरोबर तुमच्या इतर मित्र तसेच मैत्रिणींना देखील नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील मागणी पत्र मराठी 2022 मध्ये ( Magni Patra in Marathi )कसे लिहायचे हे समजेल .

आणखी वाचा :-

धन्यवाद …!!!

TEAM IN MARATHI LEKHAK

BEAT MARK

SHAKE EFFECF