Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi | मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी

Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi | मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी

निबंध

Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi | मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी :- मित्रांनो या लेखामध्ये आपण मराठी निबंध ” मोबाईल शाप कि वरदान ” पाहणार आहोत . हा लेख तुम्ही पूर्ण वाचा . मला खात्री आहे , कि हा लेख तुम्हांला नक्कीच आवडेल :- TEAM IN MARATHI LEKHAK

Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi | मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी
Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi | मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी

मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी | Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi

Mobile Shap Ki Vardan Marathi Nibandh 10 ओळी

  1. मोबाईल हे आताच्या जगातले महत्वाचे साधन बनले आहे .
  2. आताच्या शतकामध्ये मनुष्य हा मोबेल शिवाय राहूच शकत नाही .
  3. मोबाईल मुळे बरीचशी कामे सोपी झाली आहे .
  4. मोबाईल मुळे आपण काही क्षणातच लाखोंचे व्यवहार देखील करू शकतो .
  5. तसेच काही सेकंदामध्ये आपण एखादा संदेश दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकतो .
  6. जसे मोबाईल चे बसेचाशे फायदे आहे , तसेच मोबाईल चे बरेचशे तोटे देखील आहेत .
  7. मोबाईल मुळे लोक एकलकोंडी होत चालली आहेत .
  8. मुलेदेखील मैदानामध्ये खेळण्याऐवजी मोबाईल मध्ये गेम्स खेळत असतात . यामुळे अप्रत्यक्षपणे मुलांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत आहे .
  9. मोबाईल च्या अतिवापरामुळे डोके दुखी , तसेच डोळ्यांचे त्रास होण्याची कारणे वाढली आहेत .
  10. याचामुळे मोबाईल चे जसे फायदे आहेत , तसेच याचे नुकसान देखील आहे . यामुळे मोबाईल चा वापर आवश्यकतेनुसार करणे आवश्यक आहे .

Marathi Nibandh Lekhan in Marathi Mobile Shap Ki Vardan १०० ओळी

आत्ताच्या आधुनिक काळात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती झालेली आहे . विज्ञान हे एक दररोज नवनवीन गोष्टींचा शोध लावत आहे . याच तंत्रज्ञानामध्ये मोबाईलचे तंत्रज्ञान देखील खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे , की ही एक मोठी क्रांती झालेली आहे . घरांमधील प्रत्येक व्यक्ती जवळ आपल्याला मोबाइल पाहायला मिळतो . लहान मुलांपासून ते तरुण पर्यंत व तरुण पासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हातात आपल्याला मोबाईलच पाहायला मिळतो .

आत्ताच्या या आधुनिक काळामध्ये फोनची जागाही मोबाईल घेतलेली आहे . मोबाईलचे जसे खूप सारे फायदे आहेत , तसेच त्याचे खूप सारे तोटे देखील आहेत . यामुळे मोबाईलचा वापर हा गरजेपुरता व प्रमाणातच करणे फार महत्त्वाचे आहे . कारण मोबाईलच्या अतिवापरामुळे बऱ्याचशा आजारांना सामोरे जावे लागत आहे .


Mobile Shap Ki Vardan in Marathi Nibandh २०० ओळी

आधुनिक जग हे मोबाईल शिवाय अपूर्ण आहे . आधुनिक जगामध्ये मनुष्य द्वारे केलेल्या शोधामध्ये मोबाईल हे एक खूप महत्त्वाचे साधन आहे . आज एकविसाव्या शतकामध्ये मनुष्य हा मोबाईल शिवाय राहूच शकत नाही . दिवसाची सुरुवात देखील मोबाईलचा अलार्म ने होते . नातेवाईक , मित्रमंडळी , तसेच व्यवसाय यांच्या संपर्कामध्ये राहणे हे मोबाईल मुळे खूप सोपे झाले आहे .

आताच्या आधुनिक काळामध्ये मोबाईल हा एक सर्वांचीच गरज बनलेला आहे . मोबाईल च्या मदतीने मनुष्याची बरीचशी कामे सोपे झालेले आहेत . मोबाईलचा चांगला उपयोग केला , तर मोबाईल हे एक वरदानच आहे . पण याचा दुरुपयोग करणाऱ्यांसाठी मोबाईल हा अभिशाप आहे .आजकालच्या तरुणांमध्ये मोबाईल चे चलन खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे . मोबाईल हा मनुष्याच्या जीवनाचा खूप महत्त्वाचा भाग बनलेला आहे .

मोबाईल मुळे आपण कोणत्याही ठिकाणचा नकाशा सहजपणे मिळू शकतो , तसेच आपण मोबाइल मुळे बरेच असे आर्थिक व्यवहार देखील सहज ते देखील काही सेकंदांमध्ये करू शकतो . मोबाईल मुळे आपण आपल्या दूरवर असणाऱ्या व्यक्तींसोबत देखील काही क्षणातच बोलू शकतो .

जसे मोबाईलचे बरेचसे फायदे आहेत तसेच मोबाईलचे बरेचशे तोटे देखील आहेत . जसे की मोबाईलच्या अतिवापरामुळे डोकेदुखी चे त्रास देखील वाढतात , तसेच डोळ्यांचे त्रास देखील वाढत असतात . यामुळे आपल्याला मोबाईलचा वापर हा प्रमाणात करणे फार गरजेचे आहे . यामुळे चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी मोबाईल हा वरदान आहे . तसेच याचा अतिरेक करणाऱ्या व्यक्तींसाठी मोबाईल श्राप ठरू शकतो .


Mobile Shap Ki Vardan in Marathi Nibandh in Marathi ५०० ओळी

आताच्या काळामध्ये पाहिले तर जवळजवळ सर्वच क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञान हे खूप मोठ्या प्रमाणावर विकसित झालेले आहेत . यात मोबाईलचे तंत्रज्ञान देखील इतकी वाढली आहे , की ती एक मोठी क्रांतीच झालेली आपल्याला जाणवते . आज तुम्ही पाहिले , तर प्रत्येकाच्या हातात तुम्हाला मोबाइल पाहायला मिळेल . मग तो व्यक्ती लहान असो , अथवा मोठा प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहेच .

मोबाईल हा त्याच्या काळातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील एक अविभाज्य घटकच बनलेला आहे . मोबाईल मुळे आपली बरीचशी कामे कमी वेळात व घरबसल्या होऊ शकतात . विद्यार्थ्यांसाठी देखील लहानशा शंकांचे निरसन करून घेण्यासाठी मोबाईल हे साधन खूप उपयुक्त ठरते . यामुळे मुलांच्या अभ्यासाचा वेग वाढतो . यामुळेच वेळेचा अपव्यय देखील कमी होतो .

एखाद्या दूरच्या देशांमधील किंवा दुरच्या ठिकाणाची इत्यंभूत माहिती मोबाईल च्या मदतीने आपण घेऊ शकतो . मोबाईलच्या मदतीने आपण एखाद्या ठिकाणचे हवामान , तसेच तापमान कसे आहे ? हेदेखील आपण घरबसल्या पाहू शकतो . याच बरोबर आपण मोबाईलच्या सहाय्याने आपल्याला हव्या असलेल्या आपल्या मनपसंतिचे गाणे आपण कोणत्याही वेळी ऐकू शकतो . तसेच मोबाईल ला कॅमेरा ची सोय असल्यामुळे आपण कोणत्याही ठिकाणचे अगदी सहजरीत्या फोटो काढू शकतो .

तसेच आपल्या मोबाईल मध्ये कॅल्क्युलेशन देखील ऑप्शन असते . याच्यामुळे आपण कसलेही प्रकारचा हिशोब हा काही सेकंदांमध्ये करू शकतो मोबाईल मध्ये असणाऱ्या विविध प्रकारच्या ॲप्लिकेशनच्या मदतीने आपण आपल्याला हवे असणारे विविध प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रम , तसेच सिनेमा आपण घर बसल्या मोबाईल च्या मदतीने पाहू शकतो आणि आता तर बऱ्याच ठिकाणी कॅशलेस व्यवहार होत असतात . यासाठी देखील आपल्याला मोबाईलच उपयोग करावा लागतो , म्हणजेच आपण मोबाईल च्या मदतीने एखाद्या व्यक्तीला काही क्षणांमध्ये पैसे पाठवू शकतो . या तंत्रज्ञानाचा वापर फार मोठ्या प्रमाणावर केलेला आपल्याला पाहायला मिळतो . सध्याचे जग हे सोशल मीडियाचे जग समजले जाते , दररोज नाही म्हटले तरी लाखो लोक आपले फोटोज , तसेच स्वतःची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करत असतात . याच बरोबर सोशल मीडिया चे ॲप्स म्हणजेच फेसबुक , व्हाट्सएप , इंस्टाग्राम , ट्विटर अशाप्रकारच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मदतीने विविध ठिकाणची लोक हे एकमेकांना जोडले जात आहेत . इतके सारे फायदे पाहिल्यानंतर मोबाईल वरदान नाही , असे कोण म्हणेल ?

मोबाईलचे जसे खूप सारे फायदे आहेत . तसेच मोबाईल चे खूप सारे तोटे देखील आहेत . मोबाईल मुळे लोकही एकलकोंडी होत चाललेले आहेत . मोबाईल असल्याकारणामुळे एका ठिकाणी बसलेली लोक देखील एकमेकांशी चर्चा न करता मोबाईल पाहत बसलेल्या आपल्याला बरेचदा पाहायला मिळतात . मोबाईल मध्ये नाचे संबंधांमध्ये मित्र-मैत्रिणी मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दुरावा पसरत चालला आहे . एखाद्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा कोणत्याही सण उत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्वच जण मोबाइलचा वापर करत असतात . मोबाईलच्या अतिवापरामुळे बर्‍याचशा लोकांना मोबाईलचे व्यसनच जडत चालले आहे . दिवसभर मोबाईल मध्ये गेम खेळणे , तसेच व्हिडिओ पाहणे , चित्रपट पाहणे . यामुळेच बऱ्याच व्यक्तींना डोळ्याचा त्रास देखील उद्भवतो . मोबाईलच्या अति वापरामुळे बऱ्याच लोकांना डोळ्यांचे विकार झालेले आपल्याला पाहायला मिळतात . तसेच डोके दुखी , पाठ दुखी , डोळे चुरचुरणे अशा प्रकारच्या विविध समस्यांचे प्रमाण अलीकडे वाढले . आपल्याला पाहायला मिळते काही तरुण पिढी ही मोबाईलचा वापर वाईट मार्गावर जाण्यासाठी देखील करीत आहे . मोबाईलच्या अतिवापरामुळे देखील काही तरुण पिढी आपल्याला बिघडत चाललेली पाहायला मिळते .

आपल्या घरा मधील फोनची जागा ही या मोबाईल ने घेतलेली आहे . अशा या मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे कधीकधी मोबाईल नकोसा वाटू लागतो . यातूनच प्रश्न निर्माण होतो , मोबाईल शाप की वरदान ?


आपण काय शिकलो ?

Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi | मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी :- मित्रांनो या लेखामध्ये आपण मराठी निबंध ” मोबाईल शाप कि वरदान ” पहिला . यात आपण Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi १० ओळी , १०० शब्दांत , २०० शब्दांत . ३०० शब्दांत अशाप्रकारामध्ये पहिला .

Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi | मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी
Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi | मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी

Mobile Shap Ki Vardan हा निबंध आवडला असेल , तर एक कॉमेंट करुन नक्कीच कळवा . याचबरोबर तुमच्या इतर मित्र तसेच तुमच्या मैत्रिणीसोबत देखील नक्कीच शेअर करा .

या निबंध लेखनामध्ये काही चुका आढळल्या असतील , तर कॉमेंट करून नक्कीच कळवा . आम्ही त्या चुका सुधारवण्याचा नक्कीच पर्यंत करू :- TEAM IN MARATHI LEKHAK

आणखी वाचा :-

धन्यवाद …!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *