माझे गाव निबंध मराठी | Maze Gav Nibandh Marathi

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं . मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण ” माझे गाव निबंध मराठी ( My Village Essay In Marathi ) ” पाहणार आहोत . या निबंधामध्ये माझे गाव याविषयी माहिती पाहणार आहोत . निबंधाचा वापर तुम्ही तुमच्या शैक्षणिक वापरासाठी करू शकता . चला तर मग आपण आपल्या निबंधाची सुरुवात करूया .

माझे गाव निबंध मराठी
माझे गाव निबंध मराठी

माझा गाव निबंध मराठी | Marathi Nibandh Maza Gav In 10 , १०० , 200 And 500 Words


माझे गाव 10 ओळी निबंध | Maze Gav Essay 10 Line

1 . माझे गाव हे नदीकाठी वसलेले आहे .

2 . माझ्या गावाच्या जवळच एक मोठा डोंगर देखील आहे .

3 . मी व माझे मित्र उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नदीवर पोहायला जातो .

4 . याच बरोबर कधीकधी आम्ही पार्टीचा बेत असेल तर डोंगरावर जाऊन पार्टी देखील करीत असतो .

5 . उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये झाडावर चढून आंबे खाणे देखील एक वेगळीच मजा असते .

6 . किती काही झाले तरी गावाकडचे मजा ही तुम्हाला शहरांमध्ये कधीच पाहायला मिळणार नाही .

7 . गावाकडची लोक हे प्रेमळ व दयाळू असतात .

8 . माझ्या गावातील बऱ्याच लोकांचा व्यवसाय हा प्रामुख्याने शेतीच आहे .

9 . माझे गाव हेच स्वच्छ आणि सुंदर आहे .

10 . याच सर्व कारणांमुळे मला गाव फार आवडते .


माझे गाव निबंध मराठी 100 शब्दांत | My Village Essay in Marathi in 100 Words

माझे गाव आहे नदीकाठी वसलेले आहे . यासोबत माझे गाव शहर जीवनापासून लांब असले , तरी शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या गोष्टींची उणीव आम्हाला कधीच भासत नाही . कारण शहरांमध्ये ज्या गोष्टी मिळतात , त्या गोष्टी आम्हाला आमच्या गावा मध्ये देखील मिळत असतात . फक्त काय अशा महागड्या वस्तू आहेत . त्या गावामध्ये मिळत नाही .

आमचे गाव हे इतर गावांत पेक्षा फारच मोठे आहे आमच्या गावांमध्ये कसले प्रकारची पाण्याची अडचण किंवा विजेची अडचण देखील नाही . आमच्या गावाच्या अवतीभवती डोंगर आहेत व खूप खूप झाडे देखील आहे . याच मुळे आमच्या गावातील वातावरण देखील प्रदूषण मुक्त आहे .

तुमच्या गावातील लोकांचा प्रामुख्याने व्यवसाय हा शेतीचा आहे . गावातील सर्वजण शेती करीत असतात . गावातील लोक गरीब असली तरी ते मनाने फार श्रीमंत आहेत .


माझे गाव निबंध मराठी 200 शब्दांत | Essay On My Village in Marathi in 200 Words

माझे गाव हे शहरी जीवन पासून फार लांब आहे . माझ्या गावाच्या आजूबाजूने सर्वत्र बरीच झाडे देखील आहेत . जेणे करून सर्वत्र हिरवळ पसरलेली आहे . याच मुळे माझ्या गावचे वातावरण देखील खूप स्वच्छ व प्रदूषण मुक्त आहे . जेणे करूनच माझ्या गावातील व्यक्तींना कोणत्याही प्रकारच्या श्वसनाचे आजार होत नाहीत .

माझ्या गावातील सर्वच लोक हे शेती व्यवसाय करत असतात . गावातील लोक हे शेती व्यवसाय सोबतच जोड व्यवसाय म्हणून प्रत्येकाकडे गाय व म्हैस याच बरोबर बैल देखील पाळतात याच बरोबर बरेच जण हे शेळीपालन तसेच कुक्कुटपालन देखील करीत असतात .

आमच्या गावांमध्ये शाळा असल्याकारणाने कामाला गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी शाळेत जायला लागत नाही . माझे प्राथमिक शिक्षण देखील आमच्या गावाचे शाळेतच झाले आहे . आमच्या गावातील शाळा ही फार मोठी आहे आणि येथील शिक्षण देखील फार चांगले आहे .

आमच्या गावांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम देखील राबवले जातात . यामध्ये विविध प्रकारच्या शिबिरांचे देखील आयोजन केले जाते . तसेच रक्तदान शिबिराचे देखील आयोजन केले जाते . आमच्या गावा मध्ये घेतल्या जाणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये गावांमधील सर्वजण भाग घेत असतात .

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आमच्या गावा मध्ये खूप पाऊस पडत असतो . यावेळी ओढ्याला पाणी येते . त्याचबरोबर त्या पाण्यात मासे देखील येत असतात . आम्ही मित्र मित्र पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ओढ्याला लहान लहान मासे पकडण्यासाठी जातो . यामध्ये फार मजा येते माशां सोबतच तेथे खेकड्या देखील पकडतो .

यामुळेच मला गावी राहायला फार आवडते .


माझे गाव निबंध मराठी 500 शब्दांत | My Village Essay in Marathi in 500 Words

माझे गाव हे शहरापासून 15 ते 16 किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी आणि नदीच्या काठावर वसलेले आहे . माझे गाव हे नदीच्या काठावरच वसलेले असल्यामुळे आम्हाला कसले प्रकारचे पाण्याची चिंता भासत नाही .

जेव्हा आम्ही सुट्टीमध्ये गावी जातो त्यावेळी फार मजा येते . कारण सर्वजण मित्र आम्ही एकत्र जमतो व नदीजवळ असल्यामुळे आम्ही कधीकधी नदीवर पोहायला देखील जात असतो . नदीवर पोहायला गेल्यावर फार मजा येते . होण्यासोबतच आम्ही जर कधी पार्टीचा बेत बनलाच , तर आम्ही पार्टी करण्यासाठी डोंगर जवळ असल्यामुळे आम्ही डोंगरावरच जातो व तेथेच पार्टी करतो डोंगरावर पार्टी करतेवेळी देखील फार मजा येते . कारण आपण हॉटेलमधले जेवण जेवण यात आणि मित्रांसोबत गावी डोंगरावर पार्टी करण्यात फारच मोठा फरक असतो .

आम्ही मित्राच्या वेळेस उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये एकत्र येतो . त्यावेळी आम्ही डोंगरामध्ये तसेच शेतामध्ये फिरायला देखील जातो . असतो त्यावेळी आम्ही ज्या आंब्याच्या झाडाला पाढ लागला असेल , त्या आंब्याच्या झाडावर चढून झाडाचे आंबे झाडावरच बसून खात असतो . यात देखील एक वेगळी मजा येते . कारण आपण शहरांमध्ये घरी विकत आणले आंबे खाण्यात आणि झाडावर बसून झाडाचे आंबे झाडावरून तोडून खाण्यात एक वेगळीच मजा येते . ही मजा फक्त तुम्हाला गावाकडेच पहायला मिळते .

आमच्या गावांमध्ये प्रामुख्याने शेती व्यवसाय करणारे लोक जास्त आढळून येतात . कारण इतर व्यवसायिक करण्याऐवजी गावातील लोक हे शेती व्यवसाय करणे पसंत करतात . शेती व्यवसाय या सोबतच आमच्या गावांमध्ये बरेच जण शेळीपालन तसेच कुकुट पालन देखील करीत असतात . याच सोबत आमच्या गावा मध्ये नाही म्हटले तरी सर्वांकडेच गाई व म्हशी आहेत . यामुळे आम्हाला गावामध्येच ताजे व कोणत्याही प्रकारची भेसळ न केलेले पौष्टिक दूध मिळते .

आमच्या गावातील जवळजवळ सर्वच लोकांचा प्रामुख्याने व्यवसाय हा शेती असल्यामुळे सर्वजण शेती करीत असतात . यामध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शेतामध्ये भात लावणी केली जाते . भात लावणी करताना भात लावायच्या आधी वावरामध्ये ( शेतामध्ये ) चिखल केला जातो . हा चिखल बैलांच्या मदतीने केला जातो चिखल केल्यानंतर भात लावताना फारच मजा येते . कारण भात लावताना वावरामध्ये सर्वत्र पाणी अडवून ठेवलेले असते आणि त्याच वावरामध्ये बैलांच्या मदतीने चिखल केला जातो . या चिखलामध्ये भात लावणीच्या वेळेला जर मित्र असतील तर मज्जाच मज्जा कारण भात लावताना एकमेकांच्या अंगावर चिखल उडवण्यात खूप मजा येते . याच वेळी भात लावणाऱ्या बायका अभंग किंवा लोकनेते मोठ्याने म्हणत असतात व यांच्याच मागें इतर बायका म्हणत असतात .

याच बरोबर आमच्या गावांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम देखील घेतले जातात . यांमध्ये विविध प्रकारचे मार्गदर्शनाचा कार्यक्रम जसे की कुकूटपालन शेळी पालन यांचे प्रकारच्या व्यवसायांचे मार्गदर्शन गावातील शेतकऱ्यांना दिले जाते . जेणेकरून ते शेतीसोबतच अशा प्रकारचे जोडव्यवसाय देखील करू शकतात . याच सोबत आमच्या गावांमध्ये विविध प्रकारचे शिबिरे देखील राबवली जातात . कधीकधी रक्तदान शिबिर देखील राबवली जाते . यांमध्ये गावातील सर्वजण सामील होतात .

आमच्या गावा मध्ये चवणेश्वर देवाचे एक मोठे मंदिर देखील आहे . जेव्हा आमच्या गावची यात्रा असते , त्यावेळेस या मंदिराचे खूप उत्कृष्ट प्रकारे आरास केली जाते . यामध्ये विविध प्रकारच्या लाइटिंग चा वापर केला जातो . तसेच फुलांचा देखील वापर केला जातो . रात्रीच्या वेळी मंदिर पाहिले , तर खूप म्हणजे खूपच सुंदर दिसते . ज्यावेळी यात्रा असते त्यावेळेस सर्वजण एकत्र येत असतात आणि यात्रेच्या दिवशी विविध प्रकारचे खेळण्यांची दुकाने देखील गाव मध्ये येतात . तसेच लहान मुलांसाठी पाळणे तसेच लहान-लहान गाड्या येत असतात . यावेळी लहान मुलांचे सोबतच मोठे-मोठे माणसे देख पाळण्याचा आनंद लुटत असतात . याच बरोबर यात्रेच्या वेळी बरेच आईस्क्रीम वाले त्यांच्या गाड्या घेऊन येत असतात . इतके बरेच काही असल्यामुळे यात्रेची शोभा देखील वाढते तसेच यात्रेमध्ये फार मजा येते .

मला गावाला राहायला आवडण्याचे एकमेव मुख्य कारण म्हणजे गावचे वातावरण हे एकदम स्वच्छ असते  . कोणत्याही प्रकारचे प्रदूषण गावच्या वातावरणामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही .


या निबंधासाठी तुम्ही खालील शीर्षक देऊ शकता .

  • माझ्या स्वप्नातील गाव
  • गावाची संस्कृती
  • माझे गाव सुंदर गाव
  • स्वच्छ गाव सुंदर गाव
  • माझे गाव माझी जबाबदारी
  • माझे गाव

माझे गाव निबंध मराठी व्हिडिओ स्वरूपात

मित्रांनो हा लेख वाचून देखील तुम्हाला माझा गाव निबंध मराठी याविषयी आणखी माहिती हवी असेल ,  तर खाली दिलेल्या व्हिडिओ वर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता .

माझे गाव निबंध मराठी | Maze Gav Nibandh in Marathi

आपण काय शिकलो ?

मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण ” माझे गाव निबंध मराठी ( My Village Essay In Marathi ) ” पाहिले . या निबंधामध्ये आपण माझे गाव याविषयी माहिती देखील पाहिली . मित्रांनो मी आशा करतो , की या लेखामध्ये मी दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल .

माझे गाव निबंध मराठी
माझे गाव निबंध मराठी

मित्रांनो हा निबंध आवडला असेल , तर एक कमेंट करून नक्कीच कळवा . बरोबर तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत तसेच तुमच्या कुटुंबातील व्यक्तींसोबत देखील नक्कीच शेअर करा . जेणेकरून त्यांना देखील या निबंधाचा उपयोग होईल .

मित्रांनो पुन्हा भेटू या आपल्या आणखी एका मजेशीर लेखांमध्ये तोपर्यंत 

धन्यवाद….!

आणखी वाचा :-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *