परीक्षा नसत्या तर निबंध मराठी | Pariksha Nasatya Tar Nibandh Marathi

परीक्षा नसत्या तर निबंध मराठी :- मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण ” परीक्षा नसत्या तर निबंध मराठी ( Pariksha Nasatya Tar Nibandh Marathi ) ” मध्ये पाहणार आहोत . हा निबंध आपण २ भागात पाहणार आहोत . म्हणजेच यात आपण ” Pariksha Nasatya Tar Nibandh Marathi ” हा निबंध आपण ” परीक्षा नसत्या तर निबंध मराठी ३०० शब्दांत ” आणि ” परीक्षा नसत्या तर निबंध मराठी १० ओळी ” या दोन प्रकारात पाहणार आहोत .

चला तर मग आपण आपल्या निबंधाला सुरुवात करूया …

परीक्षा नसत्या तर निबंध मराठी
परीक्षा नसत्या तर निबंध मराठी

परीक्षा नसत्या तर निबंध मराठी | Pariksha Nasatya Tar Nibandh Marathi

परीक्षा नसत्या तर निबंध मराठी 10 ओळी | Pariksha Nasatya Tar Nibandh Marathi 10 Line

  • परीक्षा नसत्या तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असते .
  • परीक्षा नसत्या तर विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये असलेले कला आणि गुण समजले असते .
  • परीक्षा नसत्या तर आई-वडिलांना देखील आपल्या मुलाला अभ्यास कर असे म्हणावे लागले नसते .
  • परीक्षा नसत्या तर मोठ मोठ्या पोस्टवर कोणाला नेमायचे यासाठी गोंधळ उडाला असता .
  • परीक्षा नसत्या तर मुलांनी अभ्यासच केला नसता जेणेकरून त्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असते .
  • परीक्षा नसत्या तर मुलांना अभ्यासासाठी रात्रभर जागा वे लागले नसते .
  • परीक्षा नसत्या तर विद्यार्थी तनाव मुक्त राहिले असते
  • परीक्षा नसत्या तर शिक्षकांना देखील मुलांचे उत्तरपत्रिका तपासण्याचा त्रास राहिला नसता .
  • परीक्षा नसत्या तर विद्यार्थी पुढील वर्गात गेलेच नसते .
  • विद्यार्थ्यांच्या दृष्टीने परीक्षा नसत्या तर खूप चांगले झाले असते पण शैक्षणिक दृष्ट्या पाहता त्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असते .

परीक्षा नसत्या तर निबंध मराठी 100 शब्दांत | Pariksha Nasatya Tar Nibandh Marathi 100 Words

परीक्षा नसत्या तर … आपल्यासाठी खूप मोठा अडथळा निर्माण झाला असता . कारण एखादे काम असेल आणि त्या कामासाठी त्या व्यक्तींची परीक्षाच घेतली नाही , तर त्या व्यक्तींची ते काम करण्याची क्षमता किती आहे ? हे आपल्याला समजण्यास खूप कठीण जाईल . याचमुळे खूप गोंधळ उडेल .

जर एखादा व्यक्ती हुशार असेल तर तो व्यक्ती किती आणि कोणापेक्षा हुशार आहे , हे ठरविण्यासाठी परीक्षा घेणे हे गरजेचेच आहे . जेणेकरून परीक्षा घेतल्यानंतर त्या व्यक्तीच्या गुणावरून तो व्यक्ती किंवा तो विद्यार्थी किती हुशार आहे हे आपण ठरवू शकतो .

या सर्व कारणांमुळेच जर परीक्षाच घेतल्या गेल्या नाहीत तर , जे हुशार विद्यार्थी आहेत , ते आपल्याला ठरवता येणार नाही .


परीक्षा नसत्या तर निबंध मराठी ३०० शब्दांत | Pariksha Nasatya Tar Nibandh Marathi ३०० Words

परीक्षा नसत्या तर… खूप मोठा गोंधळ उडाला असता . कारण आताच्या आधुनिक काळामध्ये परीक्षा घेणे हे खूप म्हणजे खूपच गरजेचे झाले आहे . कारण एखाद्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी एकमेव महत्त्वाचे साधन म्हणजे हे परीक्षेत आहे . परीक्षा घेतल्यामुळेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती किती झाली आहे , हे समजते तसेच विद्यार्थ्याच्या कोणत्या ठिकाणी चुका होत आहेत , हे समजते जेणेकरून त्या चुका सुधरवण्यासाठी खूप मदत होते .

जर परीक्षा नसत्या तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पात्रता किती आहे हेच समजले नसते , तसेच त्या विद्यार्थ्यांची प्रगती देखील खूपच कमी होईल .

जर परीक्षा नसती तर… विद्यार्थ्यांनी आपल्या पूर्णवेळ खेळण्यांमध्ये आणि मनोरंजन करण्यामध्ये घालवला असता , तसेच त्यांना परीक्षेचे कोणतेही टेन्शन उरले नसते आणि त्यांना रात्रभर जागून अभ्यास देखील करावा लागला नसता आणि आई-वडील देखील आपल्या मुलाला अभ्यास कर असे सांगावे लागले नसते .

जसे मुलांना परीक्षा नसल्याचे फायदे आहेत , तसेच त्यांना परीक्षा असल्याचे विविध प्रकारचे तोटे देखील आहेत . जर परीक्षा नसत्या… तर मुले पुढील वर्गात गेली नसती , जर परीक्षा नसत्या तर मुलाच्या अंगी आदर्श नागरिक बनवण्याचे गुण विकसित झाले नसते , तसेच त्याच्यात सामाजिक व्यवहार करण्याची समज आली नसती .

प्रत्येक विद्यार्थ्यांना पुढील वर्गात जाण्यासाठी परीक्षा देणे गरजेचे म्हणजे खूपच गरजेचे असते आणि परीक्षा पास झाल्यानंतर तो विद्यार्थी पुढील वर्गांमध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरतो .

परीक्षा देऊन विद्यार्थी आपल्याकडे असलेले टॅलेंट आणि ज्ञानाचे प्रदर्शन करतात . जे विद्यार्थी अभ्यासामध्ये हुशार असतात त्यांच्यासाठी परीक्षा आहे साधी गोष्ट असते , पण जे विद्यार्थी अभ्यासामध्ये थोडेफार कमजोर असतात , ते असे विचार करतात की परीक्षा नसत्या तर…

जर परीक्षा नसत्या तर कदाचित विद्यार्थ्याला आपल्या अंगात असलेले कला , गुण समजलेच नसते . तसेच जर परीक्षा नसत्या तर शिक्षकांना देखील विद्यार्थ्यांचे उत्तरपत्रिका तपासण्याचा त्रास देखील राहिला नसता .

विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर परीक्षा नसत्या तर खूप चांगले झाले असते . पण व्यवहाराच्या दृष्टिकोनातून पाहिले तर परीक्षा होणे हे खूपच गरजेचे आहे . जेणेकरून ते विद्यार्थ्यांमध्ये जे गुण आहेत ते विद्यार्थ्याला आणि इतरांना देखील समजले जातील . तसेच योग्य विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी संधी मिळेल जेणेकरून ते आपल्या आयुष्यात एक चांगले नागरिक बनतील .


या निबंधासाठी तुम्ही खालील शीर्षक देऊ शकता

  • परीक्षा रद्द झाल्या तर…
  • परीक्षा नसत्या तर…

परीक्षा नसत्या तर मराठी निबंध व्हिडीओ स्वरुपात

मित्रांनो हा लेख वाचूनही तुम्हांला परीक्षा नसत्या तर निबंध मराठी या विषयावर आणखी निबंध हवा असेल , तर खाली दिलेल्या व्हिडीओ वर क्लिक करून तो व्हिडीओ पाहू शकता . यामध्ये तुम्हांला Pariksha Nasatya Tar Nibandh Marathi या विषयावर आणखी निबंध मिळेल .

Pariksha Nastya Tar Marathi Nibandha | परीक्षा नसत्या तर मराठी निबंध

आपण काय शिकलो ?

परीक्षा नसत्या तर निबंध मराठी :- मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण ” परीक्षा नसत्या तर निबंध मराठी ( Pariksha Nasatya Tar Nibandh Marathi ) ” मध्ये पहिले . हा निबंध आपण २ भागात पहिले . म्हणजेच यात आपण ” Pariksha Nasatya Tar Nibandh Marathi ” हा निबंध आपण ” परीक्षा नसत्या तर निबंध मराठी ३०० शब्दांत “ आणि ” परीक्षा नसत्या तर निबंध मराठी १० ओळी ” या दोन प्रकारात निबंध पहिले .

परीक्षा नसत्या तर निबंध मराठी
परीक्षा नसत्या तर निबंध मराठी

मित्रांनो हा निबंध आवडला असेल , तर कॉमेंट करून नक्की कळवा . याच बरोबर तुमच्या इतर मित्र तसेच मैत्रिणीसोबत देखील नक्की शेअर करा . जेणेकरू त्यांना देखील परीक्षा नसत्या तर निबंध मराठी या निबंधाचा उपयोग होईल .

धन्यवाद ..!

आणखी वाचा :-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *