मित्रांनो तुम्हांला देखील गोष्टी वाचायला आवडतात का ? आणि तुम्ही देखील ” ससा आणि कासवाची शर्यत गोष्ट ( Sasa Ani Kasav Story in Marathi Written ) ” शोधत असाल , तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात .
मित्रांनो या लेखामध्ये आज आपण कासवाचे सशाची गोष्ट पाहणार आहोत . हि गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचा . मित्रांनो मला खात्री आहे , कि हि Sasa Ani Kasav Chi Goshta तुम्हांला नक्कीच आवडेल .

ससा आणि कासवाची शर्यत गोष्ट | Sasa Ani Kasav Story in Marathi Written
एक गाव होते . त्या गावांमध्ये एक ससा आणि एक कासव होते . सशाला फार गर्व होता , की आपण टुन टुन भराभर चालतो आणि कासवाला भरभर चालता येत नाही . ससा एक दिवशी कासवाला म्हणाला , ” चल माझ्यासोबत शर्यत लाव . ” कासव म्हणाले , ” तुझ्या सोबत कशी शर्यत लावायची ? तू तर टुनटुन उड्या मारत भराभर धावतोस . मी आपला हळू चालतो . ” ससा म्हणाला , ” नाही , नाही , तू माझ्या सोबत शर्यत लावलीच पाहिजे . उद्या सकाळी उठायचं आणि शर्यतीला सुरुवात करायची . इथून टेकडीवर जायचं . ” शर्यत ठरली .
दुसऱ्या दिवशी ससा आणि कासव यांची शर्यत चालू झाल्यावर ससा टुणटुण उड्या मारीत पुढे वेगाने जाऊ लागला आणि कासव आपले हळूहळू चालत गेले आणि त्याला थोड्यावेळाने ससा खूप पुढे गेलात आणि त्याला हिरवे हिरवे गवत , मुळा गाजर , अशी बाग दिसली . तो म्हणाला कासव तर खूपच मागे आहे . आपण काय थोड गवत खाऊ , थोडं गाजर खाऊ , थोडा मुळा खाऊ आणि नंतर आपण पुढे पळत जाऊ , आपणच जिंकणार . कासव जिंकने शक्यच नाही . मग सशाने गवतावर , गाजरावर , मूळ्यावर ताव मारला . पोट भरल्यावर सशाला झोप आली आणि तो तेथेच झोपून गेला . कासव इकडे हळू – हळू , हळू – हळू चालत आले आणि सशाच्या पुढे जाऊन टेकडीवर पोहोचलं . आणि ससा मागेच राहिला . नंतर ससा झोपेतून जागा झाला आणितो वेगाने धावत सुटला पण ससा पोहोचलाच नाही पण कासव मात्र अगोदर पोहोचलं आणि याच बरोबर कासवाने शर्यत जिंकली .
तात्पर्य :- कोणत्याही कामात सातत्य असेल तर यश हमखास मिळते .
आपण काय शिकलो ?
मित्रांनो या लेखामध्ये आज आपण ” ससा आणि कासवाची शर्यत गोष्ट ( Sasa Ani Kasav Story in Marathi Written ) ” पहिली .
मित्रांनो हि गोष्ट आवडली असेल , तर तुमच्या इतर मित्र तसेच मैत्रिणींसोबत देखील नक्कीच शेअर करा आणि खालील बाजूला असलेल्या स्टार्स पैकी तुम्ही या लेखाला स्टार्स देऊ शकता .
हे देखील वाचा :-
- आणखी मराठी गोष्टी वाचण्यासाठी येथे क्लिक करा .
- टोपीवाला आणि माकड मराठी गोष्ट
- उंदराची टोपी मराठी बोधकथा
- ससा आणि कासवाची शर्यत गोष्ट
- मुंगी आणि कबुतराची गोष्ट
धन्यवाद …!
TEAM IN MARATHI LEKHAK