काय मित्रांनो तुम्ही देखील ” शालेय वस्तू मागणी पत्र लेखन मराठी | Shaley Vastunchi Magani Karanare Patra Liha “ शोधत आहात ? हो , तर मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात .
शालेय वस्तू मागणी पत्र या लेखामध्ये आज आपण शालेय वस्तू मागणी करणारे पत्र पाहणार आहोत . या पत्रलेखनाचा वापर इयत्ता ८ वी , ९ वी , १० वी या वर्गातील विद्यार्थी करू शकतात .
मित्रांनो या लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा . मला खात्री आहे , कि हा लेख तुम्हांला नक्कीच आवडेल .

शालेय वस्तू मागणी पत्र लेखन मराठी
प्रति , पारिजातक बुक डेपो , सातारा . २० जून 2022 विषय :- शालेय वस्तूंची मागणी करणे बाबत . महोदय , नमस्कार मी अभिषेक सणस . न्यू इंग्लिश स्कूल या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने हे पत्र लिहित आहे . आमच्या शाळेमध्ये काही शालेय वस्तू आहेत , त्यांची सध्या कमतरता भासत आहे . त्या वस्तू आम्हाला तुमच्या दुकानामधून हव्या आहेत . वस्तूंची यादी खालीलप्रमाणे :- १) खडू :- १० बॉक्स २) डस्टर :- ५ ३) कोनमापक :- ५ ४) गुण्या :- ५ वरील सर्व साहित्य लवकरात लवकर खाली दिलेल्या पत्त्यावर पोहोचवावे अशी विनंती . याचबरोबर या साहित्याची खर्चाची पावती देखील द्यावी . सर्व साहित्य मिळताच धनादेश आपल्या दुकानाच्या नावे पाठविण्यात येईल . आपला कृपाभिलाषी , विद्यार्थी प्रतिनिधी , अभिषेक सणस , न्यू इंग्लिश स्कूल , सातारा.
आपण काय शिकलो ?
मित्रांनो मी आशा करतो , कि ” शालेय वस्तू मागणी पत्र लेखन मराठी “ या विषयीची जी माहिती तुम्ही शोधत होता , ती तुम्हांला नक्कीच मिळाली असेल .
Shaley Vastunchi Magani Karanare Patra Liha हा लेख आवडला असेल , तर तुमच्यामित्र – मैत्रिणींना देखील नक्कीच शेअर करा .
धन्यवाद …!
हे देखील वाचा :-
TEAM IN MARATHI LEKHAK