Sinha Ani Undir Marathi Story | सिंहाची आणि उंदराची गोष्ट

Sinha Ani Undir Marathi Story | सिंहाची आणि उंदराची गोष्ट

Uncategorized गोष्टी

मित्रांनो तुम्हांला देखील गोष्टी वाचायला आवडतात का ? आणि तुम्ही देखील ” सिंहाची आणि उंदराची गोष्ट ( Sinha Ani Undir Marathi Story ) ” शोधत असाल , तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात .

मित्रांनो या लेखामध्ये आज आपण Lion And Mouse Story in Marathi Written With Moral पाहणार आहोत . हि गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचा . मित्रांनो मला खात्री आहे , कि हि Siha Ani Undir Story in Marathi तुम्हांला नक्कीच आवडेल .

Sinha Ani Undir Marathi Story | सिंहाची आणि उंदराची गोष्ट
Sinha Ani Undir Marathi Story | सिंहाची आणि उंदराची गोष्ट

Sinha Ani Undir Marathi Story | सिंहाची आणि उंदराची गोष्ट

एकेकाळी सिंह होता . तो जंगलावर राज्य करीत असे . एक दिवशी जेवण झाल्यानंतर सिंहाला झाडाखाली झोपावेसे वाटले . एका छोट्याशा उंदराने त्याला पाहिले  आणि विचार केला त्याच्यावर खेळायला मजा येईल . त्याने झोपलेल्या सिंहावर वर खाली धावायला सुरुवात केली . शेपटी वरून वर जायचा , घसरत घसरत खाली यायचा . त्याला हे करण्यात फारच मजा येत होती . थोड्या वेळानंतर सिंह मोठ्या रागाने डरकाळी फोडत जागा झाला . त्यानी त्याच्या मोठ्या पंजाने त्याला पकडले उंदरानी धडपड केली . परंतु तो सुटण्यास अयशस्वी झाला . सिंहाने त्याला गीळण्यासाठी मोठ्या जबडा उघडला . यामुळे उंदीर खूप घाबरला . ” महाराज मी खूप घाबरलो आहे , कृपया मला खाऊ नका . यावेळी मला माफ करा . मला जाऊ द्या . मी हे कधीच विसरणार नाही आणि कदाचित एकेदिवशी मी तुम्हाला मदत करू शकेल , ” असे म्हणू लागला . त्याची मदत करण्यास सक्षम आहे . या कल्पनेचे सिंहाला आश्चर्य वाटले . मग त्याने आपला पंजा उघडला आणि त्याला जाऊ दिले . ” आभारी आहे महाराज , मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही ” , असे उंदीर म्हणाला . ” तू सुदैवी आहेस मित्रा , कारण माझे जेवण आत्ताच झाले . आता जा आणि परत माझ्याशी असं वागू नकोस , नाहीतर मी तुला माझं भक्ष बनवेल ” , असे सिंह म्हणाला . 

त्यानंतर काही दिवसांनी जंगलामध्ये फिरत होता . सिंहाला पकडण्यासाठी शिकाऱ्याने जाळे पसरले होते . सिंह जाळ्या पाशी येण्याची वाट पाहत शिकारी झाडा मागे लपले होते . जसे तो आला त्याने दोरी खेचायला सुरुवात केली आणि त्याला जाळ्यांमध्ये पकडून घेतले आणि मोठमोठ्या डरकाळ्या फोडत सुटण्याचा खूप प्रयत्न केला . पण शिकाऱ्याने जाळे आवळले होते . सिंहाला घेऊन जाण्यासाठी गाडी आणण्यासाठी शिकारी गावात गेले . सिंह मोठमोठ्याने डरकाळ्या फोडत होता . उंदरासहित सर्व प्राण्यांनी सिंहाची डरकाळी ऐकली . ” महाराज संकटात आहेत . मला त्यांच्या उपकाराची परतफेड केली पाहिजे ” , असे म्हणत उंदीर धावू लागला . तो लगेच सिंहा जवळ पोहोचला . ” चिंता करू नका महाराज , मी तुम्हाला सोडतो ” , असे म्हणत तो जाळ्यावर चढला आणि त्याच्या धारदार छोट्या दातांनी त्याने जाळे कुरतडायला सुरुवात केली . शेवटी उंदराने सिंहाला जाळ्यातून मुक्त केले . 

सिंहाच्या लक्षात आले , की एक छोटासा उंदीर देखील खूप मोठी मदत करू शकतो . ” आभारी आहे उंदरा , मी तुला यापुढे कधीच त्रास देणार नाही . आनंदाने माझ्या जंगलात राहा . तु राजाचा जीव वाचवला आहेस . आता तु या जंगलाचा राजकुमार आहेस ” , असा सिंह म्हणाला . ” आभारी आहे महाराज , येतो मी लवकरच भेटू ” , असे उंदीर म्हणाला . ” कुठे चालला आहेस तू माझ्या अंगावर खेळणार नाही , शेपटी वरून घसरणार नाहीस ” , असे सिंह म्हणाला . हे ऐकताच उंदीर देखील खुश झाला आणि उंदराने सिंहाच्या पाठीवर उड्या मारायला सुरुवात केली आणि त्याच्या शेपटी वरून खाली घसरू लागला . 

थोड्यावेळानंतर शिकारी सिंहाला घेऊन जाण्यासाठी एक मोठी जाळी घेऊन आले . सिंह आणि आणि उंदराने त्याला पाहिले आणि ते त्यांच्या दिशेने धावू लागले आणि मोठ्यांनी डरकाळी फोडली शिकारी घाबरले आणि गावाच्या दिशेने पळत सुटले . 

यापुढे सिंह आणि उंदीर हे कायमचे चांगले मित्र बनले .

आपण काय शिकलो ?

मित्रांनो या लेखामध्ये आज आपण ” सिंहाची आणि उंदराची गोष्ट ( Sinha Ani Undir Marathi Story ) ” पहिली .

मित्रांनो हि गोष्ट आवडली असेल , तर तुमच्या इतर मित्र तसेच मैत्रिणींसोबत देखील नक्कीच शेअर करा आणि खालील बाजूला असलेल्या स्टार्स पैकी तुम्ही या लेखाला स्टार्स देऊ शकता .

हे देखील वाचा :-

धन्यवाद …!

TEAM IN MARATHI LEKHAK