Tahanlela-Kawla-Story-in-Marathi-तहानलेला-कावळा-मराठी-गोष्टTahanlela-Kawla-Story-in-Marathi-तहानलेला-कावळा-मराठी-गोष्ट

मित्रांनो तुम्हांला देखील गोष्टी वाचायला आवडतात का ? आणि तुम्ही देखील ” तहानलेला कावळा मराठी गोष्ट (Tahanlela Kawla Story in Marathi ) ” शोधत असाल , तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात .

मित्रांनो या लेखामध्ये आज आपण तहानलेला कावळा मराठी कथा पाहणार आहोत . हि गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचा . मित्रांनो मला खात्री आहे , कि हि Thirsty Crow Story in Marathi गोष्ट तुम्हांला नक्कीच आवडेल .

Tahanlela Kawla Story in Marathi | तहानलेला कावळा मराठी गोष्ट
Tahanlela Kawla Story in Marathi | तहानलेला कावळा मराठी गोष्ट

Tahanlela Kawla Story in Marathi | तहानलेला कावळा मराठी गोष्ट

एके काळी एका जंगलामध्ये एक कावळा राहत होता. त्याला एकदा खूप तहान लागली होती. तो पिण्यासाठी म्हणून पाणी तो इकडे – तिकडे शोधू लागला. पण त्याला कुठेही पिण्यासाठी पाणी मिळालेच नाही. कावळा खूप दुःखी झाला आणि एका मोठ्या झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसला. 

अचानक त्या कावळ्याने काही अंतरावर बागेत एक माठ पाहिला. ” अरे वा ! तिथे पाण्याचे भांडे दिसते. त्यातले पाणी मला मिळू शकेल , ” असे म्हणून तो तिथून उडाला आणि त्या पाण्याच्या माठाच्या काठावर येऊन बसला. त्याने तिथे पाहिले. त्या भांड्याच्या तळाला थोडे पाणी आहे. तो विचार करू लागला , ” हे पाणी मला कसे पिता येईल ? माझी तोच तर तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. मग त्याच्या लक्षात आले. पाण्याची पातळी वर येण्यासाठी त्याला काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. 

त्याने थोडा वेळ विचार केला आणि त्याला एक छानशी कल्पना सुचली. त्याने इकडे – तिकडे पाहीले त्या वेळी त्याला जमिनीवर इकडे – तिकडे खडे पडलेले दिसले. त्याने एकेक खडे उचलेल आणि तो पाण्यात टाकायला सुरुवात केली. बरेच खडे टाकल्यावर त्याच्या लक्षात आले की पाण्याची पातळी आधी पेक्षा बरीच वर आलेली आहे आणि त्याच्या हेही लक्षात आले की जर आपण आणखी दगड त्या भांड्यात टाकले, तर पाण्याची पातळी आणखी वर येईल म्हणून त्याने पुन्हा एक दगड उचलून माठात टाकायला सुरुवात केली. जरा वेळाने त्याच्या लक्षात आले, की पाण्याची पातळी इतकी वर आली आहे, की त्याची चोच सहज त्या पाण्यापर्यंत पोहोचू शकेल आणि तो आपली तहान भागवू शकेल. 

मग त्याने पाणी पिण्याचा प्रयत्न केला आणि ते पाणी त्याच्यात उंचीपर्यंत येत असल्यामुळे त्याने पाणी पिले आणि त्याची तहान भागवली. 

अशा रीतीने कावळा पाणी पिऊन समाधानाने उडून गेला.

तात्पर्य :- गरज ही शोधाची जननी असते.

आपण काय शिकलो ?

मित्रांनो या लेखामध्ये आज आपण ” बोधकथा तहानलेला कावळा ” पहिली .

मित्रांनो हि गोष्ट आवडली असेल , तर तुमच्या इतर मित्र तसेच मैत्रिणींसोबत देखील नक्कीच शेअर करा आणि खालील बाजूला असलेल्या स्टार्स पैकी तुम्ही या लेखाला स्टार्स देऊ शकता .

हे देखील वाचा :-

धन्यवाद …!

TEAM IN MARATHI LEKHAK