Takrar Patra in Marathi | तक्रार पत्र लेखन मराठी 2022Takrar Patra in Marathi | तक्रार पत्र लेखन मराठी 2022

Takrar Patra in Marathi | तक्रार पत्र लेखन मराठी 2022 :- मित्रांनो आज आपण या लेखामध्ये आपण ” तक्रार पत्र कसे लिहावे ” हे पाहणार आहोत . याचबरोबर आपण तक्रार पत्रलेखनाचे नमुने मराठीमध्ये देखील पाहणार आहोत .

तक्रार पत्र लेखन मराठी 2022 या लेखामध्ये दिलेले तक्रार पत्रलेखनाचे नमुने आहेत . यांच्या आधारे तुम्ही तुमच्या परीक्षेमध्ये जर या संबंधित काही प्रश्न आले , तर या तक्रार पत्र लेखाच्या नमुन्यांच्या आधारे त्या प्रश्नाची उत्तरे लिहू शकता .

Takrar Patrlekhan Namuna in Marathi Language या लेखामध्ये दिलेली तक्रार पत्र लेखन मराठी 9वी , तसेच तक्रार पत्र लेखन मराठी 10वी या दोन्ही वर्गांसाठी वापरलं तरी क्चालेल . याचबरोबर इतर वर्गांसाठी देखील वापरली तरी देखील चालू शकते .

या लेखामध्ये आपण खालील पत्रलेखनाचे नमुने पाहणार आहोत .

 • वृक्षारोपणासाठी मागविलेली रोपे खराब निघाल्याबद्दल तक्रार पत्र लिहा .
 • फेरी वाल्यांकडून होणार्या त्रासामुळे नगर पालिकांना पत्र लिहा.
 • तुमच्या भागात पिण्याच्या पाण्याचा अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्या कारणाने महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याकडे तक्रार करणारे पत्र लिहा.
 • तुमच्या भागात घंटा गाडी नियमित येत नसल्या कारणाने महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याकडे तक्रार करणारे पत्र लिहा.
Takrar Patra in Marathi | तक्रार पत्र लेखन मराठी 2022
Takrar Patra in Marathi | तक्रार पत्र लेखन मराठी 2022

Takrar Patra in Marathi | तक्रार पत्र लेखन मराठी 2022

मित्रांनो काही व्यक्तींना माहित नसते , कि आपण Takrar Patra in Marathi म्हणजेच तक्रार पत्र लेखन मराठी कसे लिहायचे ? यांच्यासाठीच आपण हा लेख लिहिला आहे . यात आपण तक्रार पत्र कसे लिहावे ? हे शिकणार आहोत . जेणेकरून तुम्हांला जर एखाद्या वेळी Complaint Letter in Marathi मध्ये लिहिण्याची वेळ आली , तर तुम्ही लिहू शकता .

तक्रार पत्र म्हणजे काय ?

मित्रांनो एखाद्या वेळी तक्रार हि पत्राद्वारे करायची केली जाते . त्या पत्राला ” तक्रार पत्र ” असे म्हटले जाते .

Takrar Patra in Marathi Format

[ पत्र स्वीकारणाऱ्याचे नाव ,
पत्ता लिहावा . ]
दिनांक :- 2 जून 2022     { दिनांक याच फोर्मेट मध्ये }

विषय :- [ येथे पत्रलेखनाचा विषय कमीत-कमी शब्दांत लिहावा . ]

माननीय/आदरणीय , महोदय/महोदया ,

[ येथे पत्राचा मजकूर लिहिण्यास सुरुवात करावी . ] 
______________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________

आपला कृपाभिलाषी किंवा आपला विश्वासु ,
[ पत्र लिहिणाऱ्याचे नाव ,
पत्ता   ]

तक्रार पत्र नमुना

वृक्षारोपणासाठी मागविलेली रोपे खराब निघाल्याबद्दल तक्रार पत्र लिहा .

प्रति ,
ग्रीन वल्ड रोपवाटिका ,
सातारा .
दिनांक :- २ जुलै 2022

विषय :- वृक्षारोपणासाठी मागविलेली रोपे खराब निघाल्या बाबत .

महोदय ,

मी न्यू इंग्लिश स्कूल सातारा . या विद्यालयातील विद्यार्थी आहे . मी हे पत्र विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने माननीय मुख्याध्यापकांच्या सहमतीने हे पत्र लिहित आहे . आम्ही शाळेमध्ये वृक्षारोपणासाठी तुमच्याकडून काही रोपे मागविली होती , पण यातील बरीचशी रोपे हि खराब निघाली आहेत . 

आम्ही प्रत्येकवेळी वृक्षारोपणासाठी रोपे तुमच्याच रोपावातीकेमधून घेऊन येत असतो , पण याचवेळी यातील काही रोपे हि निकृष्ट दर्जाची मिळाली आहेत . हि रोपे बदलून तुम्ही नवीन रोपे पाठवाल अशी आशा करतो .

कृपया तुम्ही या तक्रारीकडे सकारात्मक दृष्टीने पाहून हि सर्व रोपे लवकरात लवकर बदलून द्यावी .

आपला कृपाभिलाषी
विद्यार्थी प्रतिनिधी,
अभी जाधव 
न्यू इंग्लिश स्कूल ,
सातारा .

फेरी वाल्यांकडून होणार्या त्रासामुळे नगर पालिकांना पत्र लिहा.

प्रति ,
आरोग्य विभाग केंद्र ,
सातारा महानगर पालिका ,
सातारा .
दिनांक :- १० ऑगस्ट 2022

विषय :- शाळेसमोरील फेरीवाल्यांचा बंदोबस्त करणे बाबत .

महोदय ,

मी न्यू इंग्लिश स्कूल सातारा या विद्यालयातील विद्यार्थी आहे . मी हे पत्र मुख्याध्यापकांच्या अनुमतीने लिहीत आहे . आमच्या शाळेच्या समोरील परिसरात बरेचशे फेरीवाले येतात . यात विविध प्रकारचे फास्टफूड विक्री करणारे देखिली येत असतात . त्यामुळे तेथे बरेचसे लोक येऊन उभे राहत असतात . यांच्यामुळे तेथे रहदारी करताना विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत .

 तसेच त्यांच्याकडील पदार्थ खाऊन ते आजारी देखील पडत आहेत . याच बरोबर या पदार्थांचे कागद तसेच इतर घाण तेथेच टाकली जाते . त्यामुळे शाळेसमोरील परिसर स्वच्छ राहत आहे . याचमुळे शाळेच्या जिवास धोका निर्माण होऊ शकतो .

आपण कर्तव्यदक्ष अधिकारी आहात , म्हणून मी शाळेच्या वतीने तुम्हाला विनंती करतो , की या फेरीवाल्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा व यातून आमची लवकरात लवकर सुटका करून द्यावी .

आपला कृपाभिलाषी
विद्यार्थी प्रतिनिधी,
अभी जाधव 
न्यू इंग्लिश स्कूल ,
सातारा .

तुमच्या भागात पिण्याच्या पाण्याचा अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्या कारणाने महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याकडे तक्रार करणारे पत्र लिहा.

प्रति ,
आरोग्याधिकारी ,
आरोग्य विभाग ,
सातारा नगरपालिका ,
सातारा.
दिनांक :- १७ जुलै 2022

विषय :- अशुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे बाबत .

महोदय ,

मी गोकुळधाम सोसायटी मध्ये राहणारा नागरिक आहे . गेल्या काही दिवसांपासून आमच्या सोसायटीमध्ये अशुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात आहे . या अशुद्ध पाण्यामुळे या सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनाला धोका पोहोचण्याची शक्यता आहे . 

तसेच या सोसायटी मधील काही नागरिक अशुद्ध पाणी पिल्यामुळे आजारी देखील पडले आहेत . याच अशुद्ध पाण्यामुळे महिला पुरुष तसेच लहान बालके यांचे देखील प्रकृती खालावली आहे . अशुद्ध पाण्याच्या पुरवठ्यामुळे नागरिकांना विविध प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे . 

कृपया आपण या समस्येकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे आणि हा अशुद्ध पाण्याचा पुरवठा लवकरात लवकर थांबवून शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याच्या सूचना द्याव्यात .

आपला कृपाभिलाषी
अभी जाधव
गोकुळधाम सोसायटी ,
सातारा .

तुमच्या भागात घंटा गाडी नियमित येत नसल्या कारणाने महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याकडे तक्रार करणारे पत्र लिहा.

प्रति ,
आरोग्याधिकारी ,
आरोग्य विभाग ,
सातारा नगरपालिका ,
सातारा.
दिनांक :- २५ ऑक्टोबर 2022

विषय :- घंटागाडी येत नसल्या बाबत .

महोदय ,

मी गोकुळधाम सोसायटी मधील एक नागरिक आहे . आमच्या सोसायटीमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून घंटागाडी नियमित येत नाही . याच्यामुळे गोकुळधाम सोसायटी च्या मुख्य परिसरामध्ये आसपास चे लोक येऊन कचरा टाकत आहेत . याच्यामुळे तेथे असणारी कचरापेटी पूर्णपणे भरून कचरा खाली पडत आहे . त्याच्यामुळे तेथे घाणीचे साम्राज्य झाले आहे . याच मुळे त्या परिसरातून रहदारी करताना नागरिकांना त्रास होत आहे . 

तसेच घाणीमुळे ते डास तसेच मच्छर यांचे देखील प्रमाण वाढत आहे . यामुळे विविध प्रकारच्या रोगांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे . याच कचऱ्यामुळे गोकुळधाम सोसायटी मधील काही नागरिक आजाराने त्रस्त देखील झालेले आहेत . घंटागाडी नियमित न आल्यामुळे कचरा खूप मोठ्या प्रमाणावर साचत आहे . त्याच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे . कृपया या समस्येकडे लवकरात लवकर लक्ष देऊन साफसफाई विभागाला हा कचरा गोळा करण्याच्या लवकरात लवकर सूचना द्याव्या अशी विनंती .

आपला कृपाभिलाषी
अभी जाधव
गोकुळधाम सोसायटी ,
सातारा .

आपण काय शिकलो ?

Takrar Patra in Marathi | तक्रार पत्र लेखन मराठी या लेखामध्ये आपण ” तक्रार पत्र कसे लिहावे ? ” हे पहिले . याचबरोबर आपण ” तक्रार पत्रलेखनाचे नमुने मराठीमध्ये ” देखील पहिले .

Takrar Patra in Marathi | तक्रार पत्र लेखन मराठी 2022
Takrar Patra in Marathi | तक्रार पत्र लेखन मराठी 2022

मित्रांनो मी आशा करतो , कि तुम्हांला हवी असलेली Takrar Patra in Marathi या विषयीची माहिती तुम्हांला नक्कीच मिळाली असेल . याचबरोबर Complaint Letter in Marathi हा लेख आवडला असेल , तर एक कॉमेंट करून अंक्कीच कळवा . याचबरोबर तुमच्या इतर मित्रांना देखील नक्की शेअर करा . जेणेकरून त्यांना देखील तक्रार पत्र लेखन मराठी 2022 समजेल .

धन्यवाद …!

आणखी वाचा :-

TEAM IN MARATHI LEKHAK

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *