उंदराची टोपी मराठी बोधकथा | Undrachi Topi Story In Marathi

उंदराची टोपी मराठी बोधकथा | Undrachi Topi Story In Marathi

Uncategorized गोष्टी

मित्रांनो तुम्हांला देखील गोष्टी वाचायला आवडतात का ? आणि तुम्ही देखील ” उंदराची टोपी मराठी बोधकथा ( Undrachi Topi Story In Marathi ) ” शोधत असाल , तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात .

मित्रांनो या लेखामध्ये आज आपण तहानलेला कावळा मराठी कथा पाहणार आहोत . हि गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचा . मित्रांनो मला खात्री आहे , कि हि Thirsty Crow Story in Marathi गोष्ट तुम्हांला नक्कीच आवडेल .

उंदराची टोपी मराठी बोधकथा | Undrachi Topi Story In Marathi
उंदराची टोपी मराठी बोधकथा | Undrachi Topi Story In Marathi

उंदराची टोपी मराठी बोधकथा | Undrachi Topi Story In Marathi

एक गाव होते . त्या गावामध्ये एक उंदीर राहत होता . एके दिवशी त्या लहानशा उंदराला एक लहानसा कापडाचा तुकडा मिळाला . तो कापडाचा तुकडा त्याने घेतला आणि त्याचे काय करायचे ? हा विचार तो करू लागला . उंदराने त्या लहानशा कापडाच्या तुकड्याची टोपी बनवायचा विचार केला .

त्या कापडाची टोपी बनवण्यासाठी तो एका शिंप्याकडे गेला आणि त्या शिंप्याला म्हणाला , “ शिंपी दादा , शिंपी दादा मला या कापडाच्या तुकड्याची टोपी शिवून द्या ना ! “ त्यावेळी तो शिंपी उंदराला म्हणाला , “ मला आता सध्या वेळ नाहीये . तू आता येऊ नकोस , मी तुला टोपी शिवून देणार नाही . “ यावर उंदीर म्हणाला , “ शिंपी दादा , शिंपी दादा मला राजा कडे जायचे आहे . तुम्ही मला टोपी शिवून द्या ना , तुम्ही छान टोपी शिवली असे मी सांगेन . त्यामुळे मग राजा तुम्हाला बक्षीस देईन . यावर शिंपी म्हणाला , “ बरं मग दे इकडे आणि ते शिंपी ने उंदराला टोपी शिवून दिली.

ती टोपी घालून उंदीर उड्या मारत राज्याच्या दरबारामध्ये गेला . अशाच उड्या मारत तो उंदीर राज्याच्या दरबारामध्ये फिरू लागला . यावर राजा म्हणाला , “ कोण आहे रे तिकडे ? आपल्या दरबाराच्या मध्ये येत आहे . त्याला पकडा रे . “ उंदराला पकडले आणि राजा समोर आणले गेले . उंदीर राजाला म्हणाला , “ राजा तुम्ही मला का पकडले ? “ यावर राजा उंदराला म्हणाला , “ तू या माझ्या दरबारामध्ये इकडे-तिकडे उड्या मारून तू आमच्या कामांमध्ये खोळंबा अआनालास . म्हणून आम्ही तुला पकडले आहे . “ यावर उंदीर म्हणाला , “ छे , छे , छे , छे तसे नाही , तुमच्या मुकुटा पेक्षा माझी टोपी छान आहे , म्हणून तुम्ही मला पकडलेत . “

यावर राजा उंदराला म्हणाला , “ अरे काय बोलतो आहेस ? राजाच्या मुकुटा पेक्षा का उंदराची टोपी चांगले असते . मी आत्ताच तुझी टोपी उडवून देतो बघ , “ राजाने शिपायाला सांगितले आणि उंदराची टोपी काढून घेतली . उंदीर हुशार होता . उंदीर म्हणाला , “ राजा भिकारी माझी टोपी घेतली , राजा भिकारी माझी टोपी घेतली . “ यावर राजा म्हणाला , “ हा तर आपल्याला भिकारी म्हणत आहे . काय करावे मग त्याने शिपायाला सांगितले उंदराची टोपी उंदरांना देऊन टाका . “ मग शिपायाने उंदराची टोपी उंदराला देऊन टाकली आणि ती उंदराने टोपी घातली आणि टुणटुण उड्या मारीत बाहेर जाताना म्हणाला , “ राजा भीला माझी टोपी दिली , राजा भीला माझी टोपी दिली .

तात्पर्य :- शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ .

आपण काय शिकलो ?

मित्रांनो या लेखामध्ये आज आपण ” उंदराची टोपी मराठी बोधकथा ( Undrachi Topi Story In Marathi ) ” पहिली .

मित्रांनो हि गोष्ट आवडली असेल , तर तुमच्या इतर मित्र तसेच मैत्रिणींसोबत देखील नक्कीच शेअर करा आणि खालील बाजूला असलेल्या स्टार्स पैकी तुम्ही या लेखाला स्टार्स देऊ शकता .

हे देखील वाचा :-

धन्यवाद …!

TEAM IN MARATHI LEKHAK