काय मित्रांनो तुम्ही देखील ” Viram Chinh in Marathi List | विरामचिन्हे व त्याचे प्रकार ” शोधत आहात ? तर मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात .
Viram Chinh in Marathi List या लेखामध्ये आज आपण विरामचिन्हे मराठी नावे इंग्रजी नावे , विराम चिन्ह चे प्रकार कोणते आहेत ? म्हणजेच विरामचिन्हे व त्याचे प्रकार प्रकार हे सर्व आपण आज या लेखामध्ये आज आपण पाहणार आहोत .
मित्रांनो हा लेख तुम्ही शेवट पर्यंत नक्की वाचा . मला खात्री आहे , कि हा लेख तुम्हांला नक्कीच आवडेल . मित्रांनो हा लेख आपण शालेय विद्यार्थ्यांसाठी बनवलेला आहे . जेणेकरून त्यांना हा लेख वाचून Punctuation Mark in Marathi या विषयीची जी माहिती आहे , ती सर्व माहिती त्यांना मिळेल .

विरामचिन्हे म्हणजे काय ? | What is Punctuation Marks in Marathi ?
मित्रांनो तुम्ही विरामचिन्हे हा शब्द देखील बर्याच ठिकाणी ऐकलाच असेल , मित्रांनो विरामचिन्हे हे एखाद्या वाक्य मध्ये कोणत्या ठिकाणी थांबायचे आहे , कोणत्या ठिकाणी हा प्रश्न आहे , वाक्य कुठे संपते , कुठे उद्गार आहे , वाक्यात कोणत्या ठिकाणी किती थांबायचे या सर्व गोष्टी समजण्यासाठी या प्रकारची चिन्हे वापरली जातात . त्यांना विरामचिन्हे असे म्हटले जाते. .
No. | Name | Sign |
---|---|---|
1. | पूर्णविराम | . |
2. | अर्धविराम | ; |
3. | अपूर्ण विराम | : |
4. | प्रश्नचिन्ह | ? |
5. | उद्गारवाचक चिन्ह | ! |
6. | अवतरण चिन्ह | ” ” , ‘ ‘ |
7. | संयोग चिन्ह | – |
8. | अपसारण चिन्ह | — |
9. | लोप चिन्ह | … |
10. | दंड | । , ।। |
11. | स्वल्पविराम | , |
12. | अवग्रह | § |
13. | विकल्प चिन्ह | / |
No. | इंग्रजी अर्थ | विरामचिन्हे |
---|---|---|
1. | Full Stop | . |
2. | Semicolon | ; |
3. | Colon | : |
4. | Question Mark | ? |
5. | Exclamation mark | ! |
6. | Quatation Mark | ” ” , ‘ ‘ |
7. | Hyphen | – |
8. | Em Dash | — |
9. | ellipsis | … |
10. | Pipe | । , ।। |
11. | Comma | , |
12. | Section sign | § |
13. | Or Mark | / |
( अ ) एखादे वाक्य असेल आणि ते वाक्य पूर्ण झाले , असे दर्शवायचे असल्यास आपण त्या वाक्याच्या शेवटी ( . ) अशा प्रकारचा एक टिंब देतो . यालाच पूर्णविराम असे म्हटले जाते .
- पूर्णविराम वाक्य मराठी
- भारत माझा देश आहे.
- सातारा हा सैनिकांचा जिल्हा आहे.
- तो माझा खूपच खास मित्र आहे.
- त्याने आज खूप आभ्यास केला.
- उद्यापासून सुट्टी आहे.
2 . अर्धविराम | Ardh Viram Chinh ( ; )
कोणतेही दोन लहान वाक्ये जोडताना उभयान्वीय अव्ययाच्या आधी ( ; ) या प्रकारच्या चिन्हाचा वापर केला जातो . यालाच अर्धविराम असे म्हटले जाते .
3 . स्वल्पविराम | Swalpviram Chinh ( , )
अ ) एकाच प्रकारातील अनेक शब्द , तसेच वाक्य लागोपाठ येत असल्यास शब्दाच्या शेवटी किंवा वाक्याच्या शेवटी ( , ) अशा प्रकारच्या चिन्हांचा वापर केला जातो . यालाच स्वल्पविराम असे म्हटले जाते .
ब ) संबोधन असे वेगळेपण दर्शवण्यासाठी .
4 . अपूर्ण विराम | Apurn Viram Chinh ( : )
जर एखादे वाक्य असेल आणि त्या वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असेल , तर ( : ) या चिन्हाचा वापर केला जातो . यालाच अपूर्णविराम असे म्हटले जाते .
5 . प्रश्नचिन्ह | Prashna Vachak Chinh ( ? )
एखादे वाक्य असेल आणि त्या वाक्यात , जर एखादा प्रश्न तयार होत असेल , तर त्या वाक्याच्या शेवटी ( ? ) अशा प्रकारचे चिन्ह दिले जाते . यालाच प्रश्नचिन्ह असे म्हटले जाते .
- प्रश्नचिन्ह वाक्य मराठी
- तुझे नाव काय आहे ?
- तू काय काम करतोस ?
- आज किती दिनांक आहे ?
- आता किती वाजले आहेत ?
- तू कुठे आहेस ?
6 . उद्गारवाचक चिन्ह | Udgarvachak Chinh( ! )
अ ) एखादे वाक्य असेल आणि ते वाक्य उद्गारार्थी असेल किंवा एखादा शब्द का असेल तर त्या शब्दाच्या शेवटी ( ! ) अशा प्रकारच्या चिन्हाचा वापर केला जातो. यालाच उद्गारवाचक चिन्ह असे म्हटले जाते .
ब ) जर एखाद्या वाक्यात उद्गारवाचक शब्द किंवा वाक्य येत नसेल , पण अशा प्रकारची भावना येत असल्यास त्या वाक्याच्या शेवटी अशा प्रकारच्या चिन्हांचा वापर केला जातो .
क ) एखाद्या वाक्यात जेव्हा तीव्र भावना व्यक्त करायचे असेल , त्यावेळी संबोधनना नंतर उद्गारवाचक चिन्हांचा वापर केला जातो .
7 . अवतरण चिन्ह | Avtaran Chinh ( ” ” ) ( ‘ ‘ )
अ ) एकेरी अवतरण चिन्ह | Ekeri Avataran Chinh( ‘ ‘ )
एखादे वाक्य असेल आणि त्या वाक्या मध्ये मन दिली जाते किंवा एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास , तसेच एखाद्या पुस्तकाचे नाव देताना ( ‘ ‘ ) या चिन्हांचा वापर केला जातो . याच चिन्हाला एकेरी अवतरण चिन्ह असे म्हटले जाते .
ब ) दुहेरी अवतरण चिन्ह | Duheri Avataran Chinh ( ” ” )
एखादे वाक्य असेल आणि त्या वाक्य मध्ये एखाद्या व्यक्तीचे बोलत असतील , म्हणजेच एखाद्या व्यक्तीने बोललेली वाक्य असतील , तर यांना या चिन्हाने दर्शवली जातात . या चिन्हांना यांना दुहेरी अवतरण चिन्ह असे म्हणतात .
8 . संयोग चिन्ह | Sanyog Chinh( – )
वाक्यातील दोन शब्द जोडताना किंवा एखादे वाक्य लिहिताना अपुरे राहिले असल्यास खालील ओळी लिहिण्या अगोदर वरील ओळीतील उरलेल्या शब्दाच्या शेवटी हे चिन्ह दिले जाते . त्यालाच संयोग चिन्ह असे म्हटले जाते .
9 . अपसारण चिन्ह | Apasaran Chinh( —)
एखाद्या वाक्यातील शब्दाविषयी किंवा संकल्पनेविषयी त्या वाक्यात आलेले स्पष्टीकरण हे त्या उर्वरित शब्दा पासून वेगळे दर्शवण्यासाठी , या चिन्हाचा वापर केला जातो . यालाच अपसारण चिन्ह असे म्हटले जाते .
10 . लोप चिन्ह | Lop Chinh( … )
एखाद्या वाक्यातील अर्धवट सोडलेले किंवा विचार खंडित झालेले दर्शविण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जातो . यालाच चिन्ह असे म्हटले जाते .
11 . दंड | Dand Chinh ( एकेरी । व दुहेरी ॥ )
आपण विविध प्रकारचे ओवी अभंग श्लोक पाहत असतो , यामध्ये असलेल्या ओवीचा किंवा आचरणाचा शेवट दर्शविण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जातो . याच चिन्हाला दंड असे म्हटले जाते .
12 . अवग्रह | Avagrah Chinh( § )
एखाद्या वाक्यात असलेल्या शब्दाचा उच्चार जर लांबवायचा असेल , तर त्या शब्दाच्या नंतर या चिन्हाचा वापर केला जातो . या चिन्हाला अवग्रह असे म्हटले जाते .
13 . विकल्प चिन्ह | Vikalp Chinh( / )
एखाद्या वाक्यात आलेल्या शब्दासाठी पर्याय दर्शवण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जातो . या चिन्हाला विकल्प चिन्ह असे म्हटले जाते .
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
-
विरामचिन्हे म्हणजे काय ?
मित्रांनो विरामचिन्हे हे एखाद्या वाक्य मध्ये कोणत्या ठिकाणी थांबायचे आहे , कोणत्या ठिकाणी हा प्रश्न आहे , वाक्य कुठे संपते , कुठे उद्गार आहे , वाक्यात कोणत्या ठिकाणी किती थांबायचे या सर्व गोष्टी समजण्यासाठी या प्रकारची चिन्हे वापरली जातात . त्यांना विरामचिन्हे असे म्हटले जाते.
आपण काय शिकलो ?
मित्रांनो मी आशा करतो , कि ” Viram Chinh in Marathi List | विरामचिन्हे व त्याचे प्रकार “ या विषयी जी काही माहिती तुम्हांला हवी होती , ती तुम्हांला नक्कीच मिळाली असेल .
विरामचिन्हे व त्याचे प्रकार हा लेख आवडला असेल , तर तुमच्या मित्र तसेच मैत्रिणींना देखील नक्कीच शेअर करा . जेणेकरून त्यांना देखील Viram Chinh in Marathi List व्यवस्तीत समजतील .
धन्यवाद…!!
TEAM IN MARATHI LEKHAK